सुनील राऊत, पुणेमहापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीत पाटी वगळता इतर सर्व वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अनियमितता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हे साहित्य खरेदी करताना अनेक ठेकेदारांशी करारही न करताच साहित्यवाटपही करण्यात आले असून या वाटप केलेल्या साहित्याच्या नोंदीही मंडळाच्या भांडार विभागाकडे नाहीत. त्यामुळे खरंच साहित्यवाटप केले का, असा सवालही उपस्थित होत आहे. शिक्षण मंडळात सुसूत्रता आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी काढलेल्या एप्रिल २०१६ च्या आदेशाचे काटोकोरपणे पालन करणेशिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी, तसेच शिक्षण मंडळाने खरबदारी घेतलेली नाही. या निष्काळजीपणाबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविलीशालेय साहित्याचा वेळेत पुरवठा न करणाऱ्या ठेकेदारांवर निविदेतील अटी तसेच करारातील अटीनुसार आर्थिक दंड वसूल करणेपावसाळा संपत आला तरी शिक्षण मंडळात शिक्षण घेणाऱ्या मुलांना अद्याप रेनकोट मिळालेला नसल्याची बाब लोकमतने उजेडात आणली होती. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत रेनकोटसह इतर सर्वच वस्तूंच्या खरेदीबाबत नगरसेकांनी शिक्षण मंडळाच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाकडून या खरेदीची चौकशी करण्यासाठी तपासणी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार, साहित्यपुरवठा करणारे ठेकेदार तसेच या खरेदीबाबत दुर्लक्ष करणाऱ्या मंडळातील कर्मचाऱ्यांच्याविरोधात समितीने कारवाईची शिफारस केली असून त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला आहे. त्यात पाटी वगळता, गणवेश, दप्तरे, वह्या, बूट व मोजे, चित्रकलावह्या, विद्यानिकेतन शाळेतील वह्या, तसेच रेनकोटचा अनियमित पुरवठा झालेला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त या अनियमिततेप्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुरविण्यात आलेल्या साहित्यामधील काही प्रमाणात साहित्य निवडून त्याची मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली नाही.ठेकेदारांकडून घेण्यात आलेली १ टक्क्यांची बयाणा रक्कम परत देऊन ५ टक्के रक्कम एफडीआर म्हणून भरून घेतली.पुरवठादाराकडून प्राप्त झालेल्या साहित्याची भांडार विभागाकडे नोंदच नाही. तसेच शाळांना वाटलेल्या साहित्याच्या नोंदीही गायब. भांडार विभागाकडे जुन्या साहित्यांच्या साठ्याच्या नोंदीच नाहीत. साहित्य ठेवण्यासाठी नाही जागा. भांडार विभागाच्या कामात अनियमितता. तपासणी पथकाने शाळांमध्ये जाऊन तपासणी केली असता दप्तरांची शिलाई उसविणे, बंध तुटणे, तसेच दप्तरांचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी