ऑनलाइन लोकमत
वाशीम, दि. 19 - तालुक्यातील सावंगा गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईने नागरीकांचा घसा कोरडा व्हायचा, परंतु गत वर्षी आपलं गाव, आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामुळे संपुर्ण गावचा कायापालट झाला असून, गाव पाणीदार बनले आहे. यामुळे शेकडो एकरावरील शेती सिंचनाखाली आली आहे. वाशीम येथुन शेलुबाजर कडे जाणाऱ्या रस्याच्या पश्चिमेला सावंगा गाव हे उंचावर वसलेले साधारणत: तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे. गावात सहा खासगी विहिरी आहेत. तसेच शासकीय नळयोजना देखील आहे. परंतु फेब्रुवारी महिना लागताच, गावात पाणीटंचाई आ वासुन उभी राहत असे. संपुर्ण गाव खडकावर व उंचीवर असल्यामुळे शेती नेहमी तोट्याचीच होती.
उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्यामुळे शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असे, परंतु भुजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने जानेवारी २०१५ मध्ये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक बलवंत गजभिये यांच्या मार्गदर्शनात ह्यआपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातुन गावाजवळुन गेलेल्या नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. सदर कामाला वर्ष उलटून गेले आहे. सध्या फेुब्रुवारी महिना लागला आहे. परंतु अद्यापही बंधाऱ्यात दहा फुट खोल पाणी कायम आहे. यामुळे गावातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील शेतशिवार सिंचनाखाली आले आहे. शेतकरी भाजीपाला तसेच उन्हाळी पिके देखील घेत आहेत. गावातील नळयोजनेला नवसंजिवनी मिळाली आहे.
सदर कामामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून गावात समृध्दीचे वारे वाहत आहे. शासनाच्या या उपक्रमामूळे गावचे चित्र पालटले असून या महत्वाकांक्षी उपक्रमाला गती दिल्यास पाणीटंचाईने होरपळणारी गावे पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
सिंचनक्षेत्रात लक्षणीय वाढ सावंगा गावात आपलं गाव, आपलं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्यावर अठरा बंधारे बांधण्यात आले. यामूळे कोरडवाहू गावची ओळख पुसली असून, शेकडो एकरातील शेती सिंचनाखाली आली आहे. गावातील विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक शेतकरी आता उन्हाळी पिके देखील घेत आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावले आहे.
संपूर्ण विदभार्ची गरज बहुतांश नद्याचे पाणी वाहून जाणारे आहे.ज्याचा फायदा परजिल्ह्यांना होत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईची उदभवते. भुगर्भात पाणीच नसल्यामुळे विहिरी, हातपंप कोरडे पडतात. त्यामुळे पाण्याची साठवणुक आवश्यक आहे. त्याकरिता आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविले जाते. यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होवुन परिसरातील शेती सिंचनाखाली येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावत असून संपुर्ण विदभासार्ठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक आहे.
आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नाल्याचे खोलीकरण व रुंदरकरण करुन त्या ठिकाणी बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविल्यास पाण्याचा स्त्रोत वाढतो याचा फायदा पाणी टंचाई निवारणासाठी मोलाचा ठरतो. याचा फायदा घेणे गरजेचे आहे. - बलवंत गजभिये वरिष्ठ भुजल वैज्ञानिक