नागपूर : सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत सरकार हस्तक्षेप करणार नाही, असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिला.एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी नागपूरमध्ये आले असता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. सिंचन घोटाळ्यातील सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले आहेत व त्यांचे काम सुरू आहे. यासाठी सरकार त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करीत आहे. विदर्भ सिंचन विकास मंडळाच्या प्रकरणांचीही चौकशी सुरू असून, लवकरच याचे परिणाम पुढे येतील, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)जलसंपदा मंत्र्यांचा तत्कालीन मंत्र्यावर ठपकासिंचन घोटाळ्याला तत्कालीन मंत्रीच जबाबदार असून अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाखाली येऊन कामे केल्याने ते अडचणीत सापडले आहेत, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ते नागपूर येथे आले असता विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. सिंचन घोटाळ्याची सर्वंकश चौकशी झाल्यास जलसंपदा विभागातील बहुतांश अधिकारी त्यात अडकतील, असे वक्तव्य महाजन यांनी केले होते. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या सह्णा फाईल्सवर आहेत. त्यामुळे ते अडकले आहेत. घोटाळ्याचे स्वरूप व्यापक आहे.
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत हस्तक्षेप नाही - मुख्यमंत्री
By admin | Published: February 28, 2015 5:07 AM