शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

नार्वेकर यांचा निकाल  विसंगत नाही का? शिवसेना अपात्रता प्रकरणी सरन्यायाधीशांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 6:06 AM

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी  १० जानेवारी रोजी दिलेला निकाल हा बेकायदेशीर, दहाव्या परिशिष्टाच्या उलट व विकृत असल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटातर्फे आमदार सुनील प्रभू यांच्या विशेष अनुमती याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.  

नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल आमच्याच न्यायालयाने दिलेल्या निकालाशी विसंगत नाही का, असा सवाल आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी की सर्वोच्च न्यायालयात, हा मुद्दा खुला ठेवताना, सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ८ एप्रिलला निश्चित केली. तसेच राहुल नार्वेकर यांच्यापुढे सादर करण्यात आलेले मूळ दस्तावेज मागवून घेतले आहे.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी  १० जानेवारी रोजी दिलेला निकाल हा बेकायदेशीर, दहाव्या परिशिष्टाच्या उलट व विकृत असल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटातर्फे आमदार सुनील प्रभू यांच्या विशेष अनुमती याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.  

...म्हणून तातडीने सुनावणी घ्या- महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे हे प्रकरण तातडीची सुनावणी घेऊन निकाली काढण्यात यावे; अन्यथा, फलनिष्पत्ती शून्य ठरेल, असे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले. - नार्वेकर यांनी निकाल देताना शिवसेनेची २०१८ ची घटना विचारात घेण्याऐवजी १९९९ ची घटना ग्राह्य मानली, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

न्या. चंद्रचूड यांचे प्रश्नचिन्हमूळ पक्ष कोणता हे ठरविताना विधीमंडळातील बहुमताची तुलना पक्ष संघटनेतील बहुमताशी करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचे ठाकरे गटाने निदर्शनास आणले. पक्षात फूट पडल्यानंतर खऱ्या पक्ष विधीमंडळ पक्षाची ओळख बहुमतातून ठरते, असे नार्वेकरांनी म्हटले होते. त्यावर न्या. चंद्रचूड यांनी प्रश्नचिन्ह लावले.

उच्च न्यायालयात सुनावणी व्हावी -- ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र का ठरविले नाही, या मुद्द्यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.- ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाऐवजी उच्च न्यायालयात याचिका दाखल करायला हवी होती, असा युक्तिवाद शिंदे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी केला.- उद्धव ठाकरे यांच्याकडून बनावट दस्तावेज सादर करण्यात आल्याचा आरोप महेश जेठमलानी यांनी केला. त्यांचा दावा देवदत्त कामत यांनी खोडून काढला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Narvekarराहुल नार्वेकरShiv Senaशिवसेना