तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, अमोल मिटकरींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:19 PM2024-08-30T13:19:00+5:302024-08-30T13:20:17+5:30

Amol Mitkari on Tanaji Sawant Statement : "अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत, परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात," असे तानाजी सावंत म्हणाले. यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Is Tanaji Sawant Halfkin a person or an institution? This is not understood, Amol Mitkari's attack | तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, अमोल मिटकरींचा हल्लाबोल

तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, अमोल मिटकरींचा हल्लाबोल

Amol Mitkari on Tanaji Sawant Statement : मुंबई  : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु  केली आहे. विधानसभेसाठी महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र, काही नेतेमंडळींच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो. नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील वाद होण्याची शक्यता आहे. "अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत, परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात," असे तानाजी सावंत म्हणाले. यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

तानाजी सावंत यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तानाजी सावंत सारख्या माणसाला हाफकिन माणूस आहे की संस्था?,  हे समजत नाही. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहे? असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. ते अकोला येथे 'एबीपी माझा"शी बोलत होते. यावेळी, आता बस्स झालं. आता राष्ट्रवादीची महायुतीतील घटक पक्षांकडून होत असलेली अवहेलना सहन होत नसल्याचे विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी या दोन्ही पक्षांच्या (भाजप-शिवसेना) लोकांना आवर घालावा, नाहीतर आता आमचा संयम सुटेल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी आपल्या पक्षाला दिला आहे.

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले? 
आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत पटलेले नाही. आज जरी कॅबिनेटमध्ये  राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो, तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असे विधान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले आहे. तसेच, या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असेही तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

तानाजी सावंतांच्या विधानावर शरद पवार गट काय म्हणाला?
लोकसभा निवडणुकीतही भाजपाची पीछेहाट झाल्यावर याला जबाबदार अजित पवार असल्याचा सूर संघ आणि भाजपाने आळवला. त्यातच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादा विषयी भूमिका व त्यांना सरकारमध्ये सामील केल्याबाबतची नाराजी ही आता उघड उघड समोर येऊ लागलेली आहे. कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांचं आहे. अजितदादांसारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित दादांच्या मनात असावी हे कधी वाटलं नव्हतं. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला याचा शोध अजित दादांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला.
 

Web Title: Is Tanaji Sawant Halfkin a person or an institution? This is not understood, Amol Mitkari's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.