शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, अमोल मिटकरींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 1:19 PM

Amol Mitkari on Tanaji Sawant Statement : "अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत, परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात," असे तानाजी सावंत म्हणाले. यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Amol Mitkari on Tanaji Sawant Statement : मुंबई  : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु  केली आहे. विधानसभेसाठी महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र, काही नेतेमंडळींच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो. नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील वाद होण्याची शक्यता आहे. "अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत, परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात," असे तानाजी सावंत म्हणाले. यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

तानाजी सावंत यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तानाजी सावंत सारख्या माणसाला हाफकिन माणूस आहे की संस्था?,  हे समजत नाही. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहे? असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. ते अकोला येथे 'एबीपी माझा"शी बोलत होते. यावेळी, आता बस्स झालं. आता राष्ट्रवादीची महायुतीतील घटक पक्षांकडून होत असलेली अवहेलना सहन होत नसल्याचे विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी या दोन्ही पक्षांच्या (भाजप-शिवसेना) लोकांना आवर घालावा, नाहीतर आता आमचा संयम सुटेल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी आपल्या पक्षाला दिला आहे.

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले? आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत पटलेले नाही. आज जरी कॅबिनेटमध्ये  राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो, तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असे विधान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले आहे. तसेच, या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असेही तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

तानाजी सावंतांच्या विधानावर शरद पवार गट काय म्हणाला?लोकसभा निवडणुकीतही भाजपाची पीछेहाट झाल्यावर याला जबाबदार अजित पवार असल्याचा सूर संघ आणि भाजपाने आळवला. त्यातच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादा विषयी भूमिका व त्यांना सरकारमध्ये सामील केल्याबाबतची नाराजी ही आता उघड उघड समोर येऊ लागलेली आहे. कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांचं आहे. अजितदादांसारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित दादांच्या मनात असावी हे कधी वाटलं नव्हतं. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला याचा शोध अजित दादांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला. 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीTanaji Sawantतानाजी सावंतNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण