शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

EVMवर काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही? पक्ष ताकदीने लढलाच नाही; कुणी मांडली रोखठोक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 08:35 IST

या चर्चेत मांडण्यात आलेल्या मतांचा अहवाल रमेश चेन्नीथला हे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व खापर ईव्हीएम मशीनवर फोडल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधातील भूमिका तीव्रपणे मांडली जात असतानाच काँग्रेस पक्षातच याबाबत एकवाक्यता नसल्याचे सांगितले जाते आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमसंदर्भात परस्परविरोधी मते मांडली आहेत.

विधानसभेतील काँग्रेस गटनेतेपदी कुणाला संधी द्यावी, प्रदेशाध्यक्ष बदलावा की कायम ठेवावा, याबाबत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसचे विधानसभा व विधान परिषदेतील आमदार तसेच पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ७च्या सुमारास रमेश चेन्नीथला दाखल झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, आरिफ नसीम खान, यशोमती ठाकूर, भाई जगताप, विकास ठाकरे आदी उपस्थित होते. 

काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढलाच नाही

रमेश चेन्नीथला यांनी सर्वच पराभूत उमेदवारांना ईव्हीएमचा दोष वाटतो का, अशी विचारणा केली. त्यावर बहुसंख्य उमेदवारांनी बूथची आकडेवारी सांगत ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काही उमेदवारांनी ईव्हीएमवर नारळ फोडणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढलाच नाही, अशी रोखठोक भूमिकाही मांडली. विधानसभेतील १६ पैकी १५ आमदार तर परिषदेतील ८ पैकी ७ आमदार आणि पराभूत ४७ उमेदवारांनीही रमेश चेन्नीथला यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभेच्या आमदारांना गटनेते पदाबाबत नाव सुचविण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली. आमदारांनी व्यक्त केलेली मते चेन्नीथला यांनी नोंदवून घेतली. पराभूत उमेदवारांनाही प्रदेशाध्यक्षाबाबत विचारणा करण्यात आली. या चर्चेत मांडण्यात आलेल्या मतांचा अहवाल चेन्नीथला हे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविणार आहेत. यानंतर गटनेतेपदाचा निर्णय दिल्लीतून कळविला जाईल, तर प्रदेशाध्यक्षांबाबतचा निर्णय घ्यायला काही कालावधी लागेल, असे काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसEVM Machineईव्हीएम मशीन