शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

इशरत जहाँ दहशतवादी

By admin | Published: February 12, 2016 4:22 AM

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीने सलग तिसऱ्या दिवशीही गौप्यस्फोटांची मालिका कायम ठेवली. इशरत जहाँ (१९) लष्कर-ए-तोयबाची सदस्य

हेडलीचा दावा : ‘लष्कर’ची सदस्य; गुजरात घातपाताचा होता कटमुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीने सलग तिसऱ्या दिवशीही गौप्यस्फोटांची मालिका कायम ठेवली. इशरत जहाँ (१९) लष्कर-ए-तोयबाची सदस्य असल्याचा दावा हेडलीने गुरुवारच्या साक्षीदरम्यान केला. इशरत जहाँ आणि अन्य काही लोक गुजरातमध्ये घातपात घडविण्यासाठी दाखल झाले होते, असा खुलासा हेडलीने विशेष मोक्का न्यायालयासमोर केला.अमेरिकेतील अज्ञात स्थळावरून मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयात हेडली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदवत होता. या साक्षीदरम्यान हेडलीने ‘लष्कर’ची महिला विंग असल्याचे मान्य करत तिचे नेतृत्व अबू आयमाची आई करत असल्याचे सांगितले. २६/११ हल्ल्याचा मास्टरमार्इंड झकी-उर-रहमान-लख्वी याने हेडलीला मुझम्मिलच्या फसलेल्या आॅपरेशनबद्दल माहिती दिली. ‘या आॅपरेशनमध्ये एक महिला सहभागी होती, मात्र आॅपरेशनपूर्वीच तिला पोलिसांनी मारल्याचे माझ्या ऐकण्यात आले,’ असे हेडलीने न्यायालयाला सांगितले. त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हेडलीला तीन नावे सांगितली. त्यातील दुसरे नाव इशरत जहाँचे होते. त्यावर हेडलीने पटकन सांगितले की, दुसरे नाव. त्या महिलेचे नाव इशरत जहाँ होते. ‘पोलिसांना एका नाक्यावर मारण्यासंदर्भात हे आॅपरेशन होते. साजिद मीरच्या आधी मुझम्मिल बट हा आमचा म्होरक्या होता. हे आॅपरेशन अपयशी झाल्याने साजिद मीरने माझ्यासमोर मुझम्मिलला दरडावले होते,’ अशी माहितीही हेडलीने न्यायालयाला दिली.राजकीय षड्यंत्र आम्ही गेली ११ वर्षे न्यायालयीन लढाई लढत आहोत. भारतीय तपास यंत्रणांनी इशरत जहाँची हत्या बनावट चकमकीत झाल्याचे म्हटले आहे. माझी बहीण निर्दोष आहे. हे राजकीय षड्यंत्र आहे. यामागे मोठ्या लोकांचा हात आहे आणि यात हेडलीचा काहीतरी फायदा आहे- मसरत जहाँ, इशरतची बहीणमुंबईतील लँडिंग पॉइंट्सची रेकी २६/११चा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांसाठी मुंबईत घुसण्याचा मार्ग सुरक्षित असावा, यासाठी मी चार ते पाच वेळा मुंबईत बोटीने फिरलो, असे हेडलीने सांगितले. अखेर गेट वे आॅफ इंडिया, वरळी आणि कफ परेड या तीन लँडिंग पॉइंट्सची रेकी केली. एप्रिलमध्ये याची माहिती साजिद आणि मेजर इक्बाल यांना दिली. तसेच या लँडिंग पॉइंट्समध्ये काही बदल करण्यात आले नाहीत ना, याची खातरजमा करण्यासाठी जुलै २००८मध्ये पुन्हा एकदा कराचीहून मुंबईत आलो.लष्कर-ए-तोयबाला आयएसआयचे प्रशिक्षण - मुशर्रफकराची : लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेतर्फे प्रशिक्षण दिले जाते आणि काश्मीरच्या कळीचा मुद्द्याबाबत भारताची भूमिका बदलत नाही, तोपर्यंत दहशतवादी हल्ले भारतात होतच राहतील, असे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे. काय होते गुजरात क्राइम ब्रांचचे म्हणणे...१५ जून २००४ रोजी गुजरात पोलिसांनी अहमदाबादजवळ इशरत जहाँ, जावेद शेख उर्फ प्रणेश पिल्लई, अमजदअली अकबरअली राणा आणि जिशान जोहर यांना चकमकीत ठार केले होते. या चकमकीनंतर गुजरात क्राइम ब्रांचने, हे चौघेही लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी असून, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता, असे स्पष्टीकरण दिले होते.भाजपा-काँग्रेस आमने-सामनेहेडली याच्या खुलाशानंतर काँग्रेस आणि भाजपात गुरुवारी नवे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. खऱ्या चकमकीला ‘फेक’ ठरवण्याचा खटाटोप करणारा काँग्रेस पक्षच डेव्हिड हेडलीच्या साक्षीनंतर खोटा ठरला आहे, अशा शब्दांत भाजपाने काँग्रेसला लक्ष्य केले. भाजपाच्या या हल्ल्याला काँग्रेसनेही तत्काळ उत्तर दिले. केवळ हेडलीच्या साक्षीच्या आधारावर बनावट चकमकीला खरी ठरवता येणार नाही, असे काँग्रेसने म्हटले. या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, असे आव्हानही काँग्रेसने दिले.इशरतची चकमक बनावटच - आव्हाडहेडलीस इशरतचे नाव माहीत नव्हते. आपल्या एजन्सींनी त्याच्या तोंडी तिचे नाव टाकल्याचा आरोप कळवा मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी सुरुवातीपासूनच इशरतची पाठराखण केली होती. गुरुवारीही हेडलीच्या जबाबानंतर ते आपल्या मतांवर ठाम होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, हेडलीने ती ‘सुसाईड बॉम्बर’ असल्याचे म्हटलेले नाही. ती दहशतवादी होती तर तिला का मारले? तिची चौकशी का नाही केली? ती चकमक बनावटच होती, असा अजूनही आपला ठाम विश्वास असल्याचेही ते म्हणाले. ती बॉम्बर होती की नाही हे आपण म्हणत नसलो तरी आपल्या तपास यंत्रणांनीच मोठ्या चलाखीने तसे पुढे आणल्याचेही आव्हाड म्हणाले.एन्काउंटर करणाऱ्यांना वाचविण्याचा डाव ठाणे : ‘इशरत दहशतवादी असल्याचे हेडलीकडून वदवून घेण्यात आले आहे. ज्यांनी तिचा एन्काऊंटर केला त्यांना वाचवण्याचे हे कारस्थान आहे. माझी इशरत निर्दोष आणि निष्पाप होती. मी मुलगी गमावली, चौकशीचा जाच आणि बदनामीचा त्रास गेल्या १२ वर्षांपासून आमचे कुटुंब भोगत आहे,’ अशा शब्दांत इशरत जहाँची आई शमिमा कौसर यांनी आपली नाराजी व्यक्त केली.इशरत जहाँचा संबंध दहशतवादी संघटनांशी लावला जाऊ शकत नाही. हेडलीला अशा प्रकारे प्रश्न विचारण्यामागे नक्कीच काहीतरी राजकीय हेतू आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी चुकीचे प्रश्न विचारले आहेत. - वृंदा ग्रोव्हर, इशरत जहाँच्या आईची वकील