लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एटीएसने अटक केलेल्या उत्तरप्रदेशातील आफताब याने २०१४ मध्ये पाकिस्तानातून आयएसआयचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला आयएसआयने इमेल खाते उघडून दिले होते. तसेच लॅपटॉप खरेदीसाठी ५ हजार रुपये व ४०० युएस डॉलर दिल्याची कबुली त्याने तपास यंत्रणांना दिली आहे. याप्रकरणात इक्बाल आणि दानिश या दोघांची नावे समोर आली असून युपी एटीएस त्यांचा शोध घेत आहेत.उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईत मुळचा उत्तरप्रदेशातील फैजाबाद येथील रहिवासी असलेल्या आफताब अलीसह मुंबईतून जावेद इक्बाल नेवीवाला (३१), अल्ताफ कुरेशी (३३) या तिघांना अटक केली. युपी एटीएसच्या कोठडीत असलेल्या आफताब याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने माहीती देण्यास सुरुवात केली आहे.त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, धोराजीचे रहिवासी असलेले जावेद आणि अल्ताफ हे दोघांच्या परिचयातले आहे. अल्ताफ हा जावेदकडे नोकरी करत होता. २००७ आणि २०११ मध्ये कराचीहून आलेल्या इक्बालसोबत जावेदची ओळख झाली. त्यानंतर इक्बालने दानिश नावाच्या इसमासोबत जावेदची ओळख करुन दिली.दानिशच्या सांगण्यावरुन जावेदने अल्ताफच्या माध्यमातून आफताबच्या खात्यात पैसे जमा केले होते. मात्र हा इक्बाल आणि दानिश कोण आहे? त्याने कोणाच्या सांगण्यावरुन हे पैसे जमा करण्यास सांगितले याचा शोध सुरु आहे.त्यात आफताबने २०१४ मध्ये पाकिस्तानमध्ये आयएसआयचे प्रशिक्षण देण्यात आले. तेथे त्याला इमेलचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आयएसआयकडून त्याचे इमेल खाते देखील उघडून देण्यात आली असल्याची माहिती त्याने तपास यंत्रणांना दिली आहे. आफताबला लपटॉप खरेदीसाठी ५ हजार रुपये व ४०० युएस डॉलर दिल्याचेही त्याने कबुल केले आहे.२००८ बॉम्बस्फोटप्रकरणातही कनेक्शनयासीन भटकळला जावेदने फंडींग केल्याची माहिती तपासात समोर येत आहेत. अशात २००७ मध्ये कराचीहून आलेल्या इक्बालसोबत जावेदची ओळख झाली होती. त्याच दरम्यान २००७ मध्ये यासीनने केरळमध्ये जाऊन ई. टी. साईनुद्दीन याच्याकडून बॉंब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. दिल्लीत २००८ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटासाठी यासीननेच बॉंब पुरविले असल्याचे निष्पन्न झाले होते. अशात या बॉम्बस्फोट प्रकरणातही त्यांचे काही कनेक्शन आहे का? या दिशेनेही तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
‘आयएसआय’ने उघडून दिला आफताबला ईमेल
By admin | Published: May 08, 2017 4:54 AM