शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

इसिसला आता थेट मुंबईतूनच फंडिंग; एटीएसचा शोध सुरू

By admin | Published: July 19, 2016 3:53 AM

मालवणीतील चार तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेले होते.

मनीषा म्हात्रे,

मुंबई- मालवणीतील चार तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेले होते. त्यापाठोपाठ सीएसटी परिसरातील हॉकरकडून इसिससाठी निधी गोळा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गोवंडीतील एका महिलेने याविरुद्ध आवाज उचलला. मात्र प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांकडूनच दबाब आणण्यात येत आहे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. याप्रकरणी एटीएसकडूनही तपास सुरु करण्यात आला आहे. मालवणीतले चार तरुण ‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सीरियामध्ये (इसिस) दाखल होण्यासाठी गेले. त्यापैकी तिघांना परत आणण्यास तपास यंत्रणेला यश आले. तसेच तपास यंत्रणेने राज्यातील इसिसचे जाळे नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडक कारवाई राबविली. त्यामुळे गेले काही दिवस हे प्रकरण थंडावले होते. दरम्यान सीएसटी परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून इसिससाठी निधी गोळा केला जात असल्याची माहिती गोवंडीतील यास्मीन शेख या महिलेने उघडकीस आणली. यास्मीन यांचाही या परिसरात गॅस लायटर विक्रीचा व्यवसाय आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून शब्बीर शेख नावाचा इसम हा इसिसचा महाराष्ट्र प्रमुख असल्याचे सांगून निधी गोळा करत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्येक फेरीवाल्याकडून दिवसाला ४०० ते ५०० रुपये उकळले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पैसे न दिल्यास मारझोड करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवली जात असल्याचे यास्मीन यांचे म्हणणे आहे. मात्र शब्बीरच्या या दहशतीविरुद्ध यास्मीन यांनी आवाज उचलल्याची माहिती पोलिसांना दिली. हाच राग मनात धरत शब्बीरने शेख कुटुंबियांना मारझोड करत त्रास देण्यास सुरुवात केली. गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करत हात वर केल्याचा आरोप शेख करत आहेत. शब्बीर शेखचे देशी दारुचे दुकान असल्याची माहितीही समोर आली आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी शब्बीर साध्या गणवेशातील पोलिसांसोबत यास्मिनच्या घरी येतो. शिवाय खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची भीती घालून ५० हजारांची मागणी करत असल्याचेही यास्मिन यांनी सांगितले. याबाबतही त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षास देखील माहिती दिली आहे. मात्र पुन्हा असे पोलीस आल्यास चौकशी करु, असा सल्ला यास्मीन यांना देण्यात आला. अखेर उपोषणाचा मार्गशबीरची वाढती भीती त्यात पोलिसांकडून मिळत असलेल्या असहकार्यामुळे शेख कुटुंबियांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यास्मीन या पती सय्यद आणि पाच वर्षांची मुलगी माहेनूरसह गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसल्या आहेत. रविवारी त्यांची प्रकृति जास्त खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या पुन्हा उपोषणाला बसल्या आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वांना भीती आहे, मात्र आवाज उठविण्यासाठी सगळेच घाबरत असल्याचे तिचे म्हणणे आहे.या प्रकरणी माहिती घेऊन चौकशी करण्यात येत असल्याचे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>तक्रारदार महिलाच दोषी : तक्रारदार महिला ३२६ गुन्ह्यांत आरोपी आहे. याप्रकरणी तिच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल आहेत. दरम्यान तिच्या तक्रारीनुसार संबंधित इसमावर कारवाई करण्यात आली होती. त्यात जवळपास पाच ते सहा तक्रारी तिच्या पतीविरुद्ध आहेत. त्याच्यावर कारवाई करु नये, म्हणून सदर महिला खोटी माहिती पुरवित असल्याचे एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी सांगितले. >तब्बल चार तक्रारी दिल्या: गेल्या सहा महिन्यांत यास्मीन यांनी शिवाजी नगर, एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तब्बल ४ तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करत हातवर केल्याचा आरोप शेख करत आहेत. प्रकरण दाबण्यासाठी शब्बीर साध्या गणवेशातील पोलिसांसोबत यास्मिनच्या घरी येतोमाझा काही संबंध नाहीमला इसिस बाबत काहीही माहिती नाही. मी कुणाकडूनही पैसे उकळलेले नाही. यास्मीनच माझ्याविरोधात खोटी माहिती पसरवित आहे. मी वडापावचा धंदा चालवून माझ्या कुटुंबियांचा उदर्निवाह करतो. या महिलेच्या भितीने आम्ही दुसरीकडे रहायला आलो अशी माहिती शब्बीर शेखने लोकमतशी बोलताना दिली. अनेकदा खोट्या तक्रारी करुन तिने पोलिसांच्याही नाकीनऊ आणले आहे. त्यामुळे या महिलेवरच कारवाई होणे गरजेचे असल्याचे शेखचे म्हणणे आहे.