वीरेंद्रकुमार जोगी - नागपूरमंगळ यानाच्या यशस्वी चाचणीने आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. याच क्रमात आता भारताने इंडियन नेव्हिगेशन सिस्टीम (आयएनएस) च्या माध्यमातून ‘गुगल मॅप’पेक्षाही विकसित तंत्रज्ञान विकसित करण्याकडे इस्रोची वाटचाल सुरू आहे. गुगलच्या साहाय्याने सर्व जगावर नजर ठेवणाऱ्या अमेरिकेच्या दृष्टीनेही ही मोठीच गोष्ट आहे़ यात आणखी एक पाऊल पुढे टाकले गेले असून, जमिनीवरील घटकांचा विकास करण्यासाठी इस्रोने पुढाकार घेतला आहे. इस्रोच्या रिमोट सेन्सिंग विभागाच्या ‘स्पेस बेस’ इन्फॉर्मेशन सपोर्ट फॉर डिसेंट्रलाइस्ड प्लॅनिंग (एसआयएसडीपी)च्या माध्यमातून आता विकासाचा नवा ‘मॅप’ तयार करण्यात येणार आहे. विशेषत: यात सर्व पंचायतींना जोडण्यात येणार असल्याने गावांचा विकास आणखी जोमाने करता येणार आहे. इस्रोच्या रिमोट सेन्सिंग विभागाचे नागपूर केंद्रातील अधिकारी ए़ आनंद यांनी ही माहिती दिली़ ही सुविधा संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध असून, प्रशासकीय व्यवस्था सुरळीत करण्यात याचा मोलाचा वाटा राहणार आहे. सध्या उपलब्ध असलेले नकाशे डाऊनलोड करता येत नसले तरी देखील ते सहजतेने मिळू शकतील, असेही ए. आनंद यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांना जोडणार आयआरएनएसच्या माध्यमातून देशातील लहानात लहान गोष्टींवर नजर ठेवण्यात येणार आहे. केवळ नजर ठेवण्यापुरते मर्यादित न राहता याचा विकासासाठी काय फायदा होऊ शकेल, याचा विचार ही नवी यंत्रणा तयार करताना करण्यात आला आहे. या प्रकल्पाशी देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना जोडण्यात येणार आहे. विशेषत: ग्रामपंचायतींना जोेडण्यात येणार असल्याने त्यांच्यापर्यंत विकासाचे प्रकल्प पोहोचविताना मोठी मदत होणार आहे. ३६ हजार कि़मी़वर नजर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) साहाय्याने भारतीय वैज्ञानिकांनी ‘अॅडव्हान्स सिस्टीम’ तयार केली आहे. या माध्यमातून भारतीय उपखंडाचे मॅपिंग केले जात आहे. नागरी, वाहतूक, वातावरण, संवाद व सैन्य या घटकांमध्ये याचा फायदा होणार आहे. विकासाच्या दृष्टीनेही लाभ व्हावा, यासाठी एसआयएसडीपी हे तंत्रज्ञान साहाय्यक ठरणार आहे. भारतीय उपखंडातील सुमारे ३६ हजार किमीच्या भूभागावर नजर ठेवणार. शेती, वन, जमीन, पर्जन्यमान, हवामान या सर्व घटकांचा सर्वंकष वापर करण्यासाठी हे तंत्रज्ञान मोलाचे ठरणार आहे. विशेषत: विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. औद्योगिक विकासात देखील याचा अप्रत्यक्ष फायदा होणार आहे. जल, जमीन, जंगल विकासाचा प्रकल्प‘एसआयएसडीपी’च्या माध्यमातून वने, शेती, पाणी यांच्या नियोजनासाठी सर्वाधिक फायदा होणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना विकासाचे अनेक अधिकार मिळाले आहेत. मात्र नकाशा व मार्गदर्शनाअभावी त्यांना अडचणी येतात़ अशा वेळी एसआयएसडीपी ही त्यांना मोलाची मदत करणार आहे. यासोबतच प्रशासक ीय यंत्रणेला देखील अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हे फायदेशीरठरेल़ रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाणार आहे. नैसर्गिक साधनांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचेही ए. आनंद म्हणाले़प्रकल्प राबवून केले जातेय मॅपिंग इस्रो व नॅशनल रिमोट सेन्सिंग सर्व्हिस सेंटर (एनआरएससी) एसआयएसडीपी यांनी विविध विभागांशी संपर्क साधून डाटाबेस तयार केला आहे. यात लोकसंख्येपासून भूजल पातळीपर्यंत सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. हंगामातील लागवडीचे हेक्टरी क्षेत्र देखील कळू शकेल़ वेळोवेळी ही माहिती अद्ययावत करण्याचे कार्य देखील सुरू आहे. ‘भुवन’ या संकेतस्थळावर नकाशे व चित्रे अपलोड करण्यात आली असून, वर्गवारीनुसार हे नकाशे कुणालाही पाहता येतील. यासाठी विविध विभागांतून माहिती एकत्र करण्यात येत आहे. याचा फायदा सर्व प्रशासकीय यंत्रणेसह सर्वसामान्यांना मिळू शकेल़ भुवन यासाठी ठरणार फायदेशीऱ़़ जलव्यवस्थापन, नद्यांचे बेसिन, भूजल पातळी, जमिनीचे चढ-उतारजिल्हानिहाय मृदा व मातीचे प्रकार विभागवार जंगलाचे क्षेत्रफळ, लागवडीचे क्षेत्रजिल्हा, तालुका व गावनिहाय लोकसंख्येचे घनत्वजिल्हा, तालुका व गावांचे क्षेत्रफळजमिनीच्या वापराचे प्रकार, वाहतुकीचे मार्गऔद्योगिक वापराचे व त्यासाठी उपलब्ध क्षेत्रसंकेतस्थळावर मिळणार सर्व माहितीगुगल मॅप प्रमाणेच ‘भूवन’च्या माध्यामतून जमिनीचे छायाचित्रे घेण्यात येत आहेत. संपूर्ण देशातील गावांच्या नकाशासह माहिती देण्यात येईन. एसआयएसडीपी या प्रकल्पाची माहिती ६६६.ल्ल१२ू.ॅङ्म५.्रल्ल व ६६६.इँ४५ंल्ल.ल्ल१२ू.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर पहाता येऊ शकते. तूर्तास यावरील नकाशे डाऊनलोड करता येत नसून भविष्यात यावर विचार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इस्रोने केले स्वदेशी मॅपिंग!
By admin | Published: January 11, 2015 1:41 AM