मुंबई: एल्गार प्रकरण, सुधारित नागरिकत्व कायद्यापाठोपाठ आता आणखी एका विषयावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. गेल्याच आठवड्यात अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं. याबद्दलचं विधेयक लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलं जाईल. यानंतर या संदर्भात अध्यादेशही काढला जाईल, असंदेखील ते पुढे म्हणाले होते. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत अद्याप हा विषय अधिकृतपणे आपल्याकडे आला नसल्याचा दावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये समन्वय नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद; मंत्री सांगतात एक, तर मुख्यमंत्र्यांचा वेगळाच दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 12:45 PM
मुस्लिम आरक्षणावरुन मंत्री नवाब मलिक आणि मुख्यमंत्री ठाकरेंचा वेगवेगळा दावा
ठळक मुद्देमुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारमध्ये मतभेदमुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री नवाब मलिक यांचा वेगवेगळा दावामुस्लिम आरक्षणाचा विषय अधिकृतपणे माझ्याकडे आला नाही- मुख्यमंत्री