शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

"लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालणार नाहीत"; फडणवीस यांनी मुंबई, कोकणातील आमदारांना दिला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 7:53 AM

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे मुद्दे विधानसभा निवडणुकीत चालणार नाहीत. विरोधकांनी भाजप आणि मित्र पक्षांबद्दल जे फेक नरेटिव्ह चालविले, त्यातील फोलपणा आता लोकांना समजला आहे. त्यामुळे विधानसभेला विजय आपलाच होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या  मुंबई आणि कोकणातील आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला.

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले. 

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले, तर संविधान बदलले जाईल, तसेच आरक्षण संपुष्टात येईल, असा अपप्रचार महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला. त्याचा मोठा फटका मुंबईत बसला, असे मत आमदारांनी व्यक्त केले. मुस्लीम समाजाने मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मते दिली. संविधान बदलाच्या अफवांमुळे दलित मतदारदेखील त्यांच्याभोवतीच एकवटला. मात्र, लोकसभा निवडणुकीत असलेले हे मुद्दे आता विधानसभा निवडणुकीत नसतील, असे मत आमदारांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी या भूमिकेला दुजोरा दिला, पण त्याच वेळी महाविकास आघाडीकडून आणखी काही फेक  नरेटिव्ह पसरविले जातील; त्यांचा यशस्वीपणे मुकाबला करा,  असे ते म्हणाले.

१९९८च्या निवडणुकीचा दाखला  लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले, याचा अर्थ विधानसभेलाही येईल, असे मानण्याचे काहीही कारण नाही. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला महाराष्ट्रात १४ जागा मिळाल्या होत्या. आपल्या विरोधकांना ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर एकच वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या युतीला सव्वाशे पेक्षा अधिक जगा मिळाल्या होत्या. पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या जवळपास आपण पोहोचलो होतो, याकडे फडणवीस यांनी आमदारांचे लक्ष वेधले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी मंत्री गणेश नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMLAआमदारvidhan sabhaविधानसभा