- काशिनाथ वाघमारेसोलापूर : मुलांना भिक देऊ नका, त्यांना अपंग करून भिकेला लावणाºयांविरोधात लढा द्या, भिकेची प्रथा नष्ट झाली पाहिजे, शासनाला जाणीव करून द्या, असा संदेश देत, दिल्लीचा एक तरुण भारतभर जनजागृतीपर भ्रमंती करतोय़ सरकारला याबाबत जाग यायला हवी, अशी अपेक्षा करून, तो ८४ दिवसांत ३७०० किमीचा प्रवास करून चालला आहे़आशिष शर्मा असे त्याचे नाव़ एका लहान मुलाच्या घटनेने दुखावला गेला आणि त्याने अशा भीक मागून जगणाºया मुलांना सन्मानाचे जीवन मिळावे, म्हणून भीक देण्याच्या प्रथेविरोधात प्रबोधन करीत रस्त्यावर आला़ २२ आॅगस्ट २०१७ हा दिवस त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला़ आज ८४ दिवसांत तो काश्मीरपासून सोलापूरपर्यंतचे ३७०० किलोमीटर अंतर चालत, लहान मुलांना भीक देऊ नका अन्यथा भीक मागण्याची परंपरा थांबणार नसल्याबाबतचे शाळा-महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी प्रबोधन करत फिरतोय़ आता तो लातूर, नांदेड, वासीम मार्गे मध्य प्रदेशात प्रबोधन करीत निघाला आहे.
पॅकेजवर सोडले पाणीएके दिवसी एक हात निखळलेला मुलगा भीक मागत असलेल्या अवस्थेत आशिषला दिसून आला़ कोवळ्या वयात त्याला कोणीतरी अघोरी कृत्याने विकलांग बनवून भीक मागायला लावल्याचे लक्षात आले़ त्याचे मन हेलावले़ बस्स़़़त्याने ठरवले, स्वत:साठी तर सारेच जगतात़, परंतु इतरांसाठी जगून बघण्यासाठी त्याने चक्क सहा लाख रुपये पॅकेजवाल्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या नोकरीवर पाणी सोडले़ सुरुवातीला भीक मागणाºया ९ मुलांना घेऊन, त्यांना एका सामाजिक सेवाभावी संस्थेच्या हवाली केले़ हाच धागा पकडत, त्याने एक यंत्रणाच बनवली़