शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

...त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो; महिला मुख्यमंत्री मिळेल का?

By यदू जोशी | Updated: September 20, 2023 11:55 IST

.. तर राज्यात असतील ९५ महिला आमदार, सध्या आहेत २५, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा महाराष्ट्राने आधीच केला आहे

मुंबई : महिलांना विधानसभेत ३३ टक्के आरक्षणाचा कायदा झाला तर महाराष्ट्रात किमान ९५ महिला आमदार असतील. सध्या ही संख्या २५ आहे. याचा अर्थ विधानसभेतील महिला राज जवळपास चौपटीने वाढेल. आतातरी राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल काय, अशी चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा महाराष्ट्राने आधीच केला आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के महिला राज आधीपासूनच आहे. आता ३३ टक्के महिला राज विधानसभेत दिसेल. या बदलामुळे काही प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो.

दबाव वाढणार

  1. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सातत्याने निवडून येत असलेल्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांना वा पुरुष मक्तेदारीमुळे संधी न मिळालेल्या महिलांसाठी आता विधानसभेचे दार कायद्याद्वारे उघडले जाईल.
  2. राज्यात महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. महिला आमदार ९५ झाल्या तर त्यासाठी दबाव वाढेल.
  3. २०१९ नंतर राज्यात ३ आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर या कॅबिनेट तर अदिती तटकरे या राज्यमंत्री होत्या. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यावर अदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या.

 

महिला खासदारांची संख्या असेल १६

सध्या राज्यात भावना गवळी, सुप्रिया सुळे, पूनम महाजन, हीना गावित, रक्षा खडसे, प्रीतम मुंडे, भारती पवार आणि नवनीत कौर अशा लोकसभेत आठ महिला खासदार आहेत. ३३ टक्के आरक्षणामुळे ही संख्या १६ होईल.

या आहेत महिला आमदार

विद्या ठाकूर, सीमा हिरे, सुमनताई पाटील, भारती लव्हेकर, मंजुळा गावित, वर्षा गायकवाड, मंदा म्हात्रे, माधुरी मिसाळ, यामिनी जाधव, लता सोनवणे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, यशोमती ठाकूर, श्वेता महाले, नमिता मुंदडा, प्रतिभा धानोरकर, मेघना बोर्डीकर, अदिती तटकरे, प्रणिती शिंदे, गीता जैन, सरोज अहिरे, सुलभा खोडके, मनीषा चौधरी, अश्विनी जगताप, ऋतुजा लटके अशा २५ महिला  विधानसभा सदस्य आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत २० महिला विजयी झाल्या होत्या.

टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणPoliticsराजकारण