ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर स्थायी समितीच्या चाव्या आपल्याकडे घेण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना निर्धास्त होती. परंतु, विश्वासात न घेता शिवसेनेला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे दोन नगरसेवक नाराज झाले होते. तसेच प्रदेशलादेखील न कळवता हा पाठिंबा दिला होता. त्यामुळे प्रदेश काँग्रेसने आता राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने शिवसेनेची गोची तर झाली आहेच, शिवाय काँग्रेसच्या गटनेत्यावरही पक्षातर्फे कारवाईचे संकेत मिळत आहेत. एकूणच बदललेल्या या परिस्थितीमुळे शिवसेनेला स्थायीच्या चाव्या मिळवणे आता अवघड जाणार असून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या मनसुब्यांवरदेखील पाणी फिरले गेले आहे. (प्रतिनिधी)
स्थायीच्या चाव्या मिळवणे शिवसेनेला अवघड
By admin | Published: April 04, 2017 5:37 AM