संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींवर केलेल्या वक्तव्यावर आता सत्ताधारी पक्षही टीका करू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसने राज्यभरात ठीकठिकाणी आंदोलने केली आहेत. संभाजी भिडेंचा निषेध व्यक्त केला आहे, त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अशातच आता सत्ताधारी मंत्र्यांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागली आहे.
जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाहीय. खरे म्हणजे तो मनोहर भिडे आहे. आंब्याच्या संदर्भात वक्तव्य होते, त्यावर आम्ही कोर्टात गेलो आहे. मोदी किंवा अमित शाह यांच्यापैकी कुणालाही महात्मा गांधींच्या बाबतीतले हे वक्तव्य आवडणारे नाही. भिडेंवर कडक कारवाई व्हावी, या मताचा मी आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली. त्यांच्याबरोबर जाणे म्हणजे आत्मघातकी आहे, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.
पंडित नेहरू यांच्या वडिलांनी सगळं देशासाठी दान केले होते. स्वतः नेहरू साडे अकरा वर्षे तुरुंगात होते. त्यावेळी माहित नव्हतं, स्वातंत्र्य मिळेल की नाही. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही, तर भलामन करू नका, स्तुती करू नका. आम्ही स्वतः भिडेंच्या विरोधात कोर्टात आहोत. पण कोर्टात तारीख मिळत आहे. भिडेंचे डोके ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाही, अशी कठोर प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.
मुंबई नाशिक मार्ग खड्ड्यांवर बोलताना मी स्वतः रेल्वेने येतो, केसरकरांची गाडी अंतर ठेवून रस्त्याच्या वरुन चालत असेल. आम्ही सगळे आमदार वेडे आहोत का? तुम्ही दुरुस्त करा, पण खड्डे नाही असं म्हणू नका, आम्ही सगळे आमदार ट्रेनने आलो आहोत. मुंबई महापालिका कोल्ड मिक्सवगैरे वापरते, ते वापरून सुधारणा करा, असे प्रत्यूत्तर भुजबळ यांनी आपल्याच सरकारला दिले.