मुंबई : एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉक्टरांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) द्यावी लागते. राज्यात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १७ हजार जागा आहेत. तर, राज्यभरात ५३ हजार विद्यार्थी एमबीबीएसची पदवी अभ्यासक्रम दरवर्षी पूर्ण करतात. त्यामुळे सरासरी एका जागेसाठी तिघांची चुरस असते. पण, या परीक्षेचा ताण घेणे योग्य नसल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यावर जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना नीट द्यावी लागते. पण, खासगी क्लासेसने नीटची काठिण्य पातळी वाढविली आहे. या क्लासमुळे विद्यार्थ्यांचा ताण अधिक वाढतो. या परीक्षेत पुस्तकी ज्ञानावर भर दिलेला असतो. रुग्णांशी संबंधित यात प्रश्न विचारले जात नाहीत. वस्तूनिष्ठ प्रश्न या परीक्षेत विचारलेले असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक बारकाईने अभ्यास करणे आवश्यक होते. अनेक विद्यार्थ्यांना पहिल्यांदा परीक्षा दिल्यावर सीट मिळत नाही. त्यामुळे पुन्हा ते पुढच्या वर्षीसाठी तयारी करतात. अनेकजणांना तीनदा परीक्षा दिल्यावर सीट मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते. या परीक्षेचा ताण येणे सहाजिक आहे. पण, अभ्यासाचा ताण येत असल्यास दुसऱ्यांची मदत घेणे आवश्यक आहे. कारण, ताण वाढल्यावर त्यावर उपाय करणे कठीण जाते. ताण कमी करण्यासाठी काही गोळ््या आहेत. त्याचबरोबर काही व्यायाम आहेत यामुळे ताण आटोक्यात येऊ शकतो. अभ्यास होत नाही, झोप लागत नसेल तर तत्काळ मानसोपचारतज्ज्ञांना भेटणे आवश्यक आहे. हे सर्व विद्यार्थी डॉक्टर असतात. त्यामुळे त्यांनी या पद्धतीने ताण घेणे योग्य नाही, असे मत डॉ. मुंदडा यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)>कांदिवलीत तरुण डॉक्टरची आत्महत्यापश्चिम उपनगरातील एका उच्चभ्रू सोसायटीमधील एका तरुण डॉक्टरने रहात्या घराच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याची घटना उघडकीस आली आहे. पार्थ पियुष बामरिया (वय २४, लोखंडवाला कॉम्पलेक्स, कांदिवली पूर्व) असे त्याचे नाव असून वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश परीक्षेत (नीट) कमी गुण मिळाल्याने नैराश्येपोटी त्याने हे कृत्य केले आहे. त्याच्या फ्लॅटमध्ये मिळालेल्या‘सुसाईड नोट’मधून ही बाब उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पार्थ हा एमबीबीएस डॉक्टर होता. पदव्यूत्तर पदवी घेण्यासाठी इच्छुक होता. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (नीट) अपेक्षेपेक्षा कमी कमी मार्क मिळाल्याने तो नैराश्यवस्थेत होता. लोखंडवाला कॉम्पलेक्स परिसरातील व्हिस्परिंग पाम या बिल्डीगच्या १८०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये डॉ.पीयूष बामरिया कुटुंबासमवेत रहातात. पार्थ हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला अभ्यासासाठी निवांतपणा मिळण्यासाठी त्यांनी याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरील ७०३ क्रमांकाचा फ्लॅट त्याला भेट म्हणून दिला होता. पार्थ या ठिकाणी चुलत भावासमवेत अभ्यास करीत असे. रविवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास त्याने फ्लॅटच्या ‘स्टेअर केस’ मधून उडी मारली. सुमारे त्याच्या आवाजाने इमारतीतील वॉचमनने त्याकडे धाव घेतली. पार्थला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून त्याने त्याचे वडील व पोलिसांना कळविले. रहिवास्यांनी त्याला नजिकच्या रुग्णालयात नेले. त्याला मृत घोषित करण्यात आले.
नीट परीक्षेचा ताण घेणे योग्य नाही
By admin | Published: January 18, 2017 4:09 AM