नागपूर : जागतिक पातळीवर क्वालिटी प्रॉडक्ट्स सादर करण्यास सज्ज रतन ग्लोबल इन्कॉर्पोरेशनने(आरजीआय) भारतात डेलीफिट ब्रॅन्ड म्हणून आपले प्रॉडक्टस् सादर केले आहेत. या मालिकेत कारले, व्हीटग्रास, गाजर, बीटरुट तसेच पालक-काकडीचे पावडर कॉन्सन्ट्रेट स्वरूपात आहेत. आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेली ही पावडर वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यास साहाय्य करते.धकाधकीच्या आयुष्यामुळे आपण नेमाने फळे आणि भाज्यांचे सेवन करू शकत नाही. त्यामुळेच रतन ग्लोबल इन्कॉर्पोरेशनने डेलीफिट पावडर कॉन्सन्ट्रेट बाजारात आणले आहे. दररोज ताजा ज्यूस मिळविण्यासाठी फक्त एक पाऊच घालून मिक्स करायचे एवढेच. देश-विदेशातील संशोधकांच्या चमूने आधुनिक पद्धतीने तयार केलेले हे पावडर ज्यूसचा रंग, स्वाद आणि गुणवत्ता पाहता ताज्या ज्यूसची लज्जत देते. सध्या बाजारात उपलब्ध पॅकेज्ड ज्यूस वा डिहायड्रेटेडपेक्षा हे पावडर कॉन्सन्ट्रेट शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत. कारले पावडर डायबिटिजच्या रुग्णांसाठी जणू वरदानच ठरते. गाजर अािण बीटरुट अॅनिमिया रुग्णांसाठी फायदेशीर. बीटरुट आणि गाजराचे अद्भुत मिश्रण पचनक्रिया सुधारते. पालक आणि काकडी डोळ्यांची निगा राखण्यासाठी उत्तम. व्हीटग्रास ही कॅन्सर रुग्णांसाठी लाभदायक ठरते. उत्तम तंत्रज्ञान आणि उच्च संशोधनातून डेलीफिटची निर्मिती झाली आहे. रतन ग्रुपने यानिमित्ताने विशेष उत्पादनांना सर्वात आधी बाजारात आणण्याचे आपले वैशिष्ट्य कायम राखले असल्याचे रतन ग्लोबल कॉर्पोरेशनचे शाह बंधू यांनी सांगितले.
आरोग्यासाठी ताज्या हिरव्या भाज्यांचे सेवन आता सोपे झाले आहे डेलीफिटमुळे
By admin | Published: February 17, 2015 1:48 AM