मुंबई : नोटाबंदी झाल्यानंतर सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करणाऱ्या अकोला, बुलडाणा आणि नाशिक येथील बड्या सराफा व्यावसायिकांवर बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. अकोल्यातील तीन सराफा व्यावसायिकांच्या दुकानांवर आयकरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या ३० अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळपासून छापेमारी केली. गांधी चौकातील केजे स्क्वेअर (खंडेलवाल ज्वेलर्स), खंडेलवाल अलंकार केंद्र आणि विश्वकर्मा ज्वेलर्सची यांची संशयावरून तपासणी केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, खामगाव (जि. बुलडाणा) येथील फरशी भागातील अग्रवाल ज्वेलर्सवरही बुधवारी आयकर विभागाने छापा मारला आणि दिवसभर हिशोबाची पडताळणी केली. नोटाबंदीनंतर बँकेत भरलेल्या मोठ्या रकमेचा हिशोब न मिळाल्याने हा छापा मारल्याचे कळते.तसेच नाशिकमधील तीन बड्या सराफा व्यवसायिकांवरही बुधवारी दुपारी आयकर विभागाने छापे टाकून सोने विक्री व्यवहाराची चौकशी केली़ (प्रतिनिधी)
मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील बड्या सराफांवर आयटीचे छापे
By admin | Published: January 19, 2017 5:49 AM