शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

राहणीमानावरून पोटगी ठरते

By admin | Published: March 14, 2017 7:36 AM

वैवाहिक वादात महिलांना दिली जाणारी पोटगी ही तिचे व तिच्या पतीचे राहणीमान, त्यांचा वर्ग आणि भविष्यातील त्यांच्या आवश्यकता आदींवर ठरते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.

मुंबई : वैवाहिक वादात महिलांना दिली जाणारी पोटगी ही तिचे व तिच्या पतीचे राहणीमान, त्यांचा वर्ग आणि भविष्यातील त्यांच्या आवश्यकता आदींवर ठरते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.अनिल गुप्ता (बदलेले नाव) यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले. सत्र न्यायालयाने गुप्ता यांना त्यांची पत्नी व दोन अल्पवयीन मुलींच्या देखभालीचा खर्च म्हणून दरमहा १२ हजार रुपये देण्याचा आदेश दिला. मात्र, गुप्ता यांनी आपली एवढी ऐपत नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयात अपील केले. तर अनीता गुप्ता (बदलेले नाव) यांनी आपण गृहिणी असून, दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची व अन्य जबाबदारी असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. अनीता यांनी सत्र न्यायालयात केलेल्या अर्जानुसार, अनिल यांचे जोगेश्वरी येथे किराणा व धान्याचे दुकान आहे. कुटुंबाचे एकूण उत्पन्न दरमहा ८० हजार रुपये आहे. त्यातील अनिलला दरमहा ४० हजार रुपये मिळतात. त्यामुळे दरमहा आपल्याला १७ हजार रुपये देखभालीचा खर्च म्हणून मिळावेत.मात्र सत्र न्यायालयाने अनिल गुप्ता यांना पत्नी व दोन अल्पवयीन मुलींच्या देखभालीसाठी दरमहा १२ हजार रुपये देण्याचा आदेश दिला. उपलब्ध माहिती-पुराव्यांवरून उच्च न्यायालयाने पत्नीने पतीचे दरमहा ४० हजार रुपये उत्पन्न असल्याचा दावा फेटाळला. मात्र, पतीने त्याच्या उत्पन्नाविषयी कुठेही नमूद न केल्याचेही निरीक्षण नोंदवले. ‘देखभालीचा खर्च मागणाऱ्या व्यक्तीच्या राहणीमानावर, त्याचा वर्ग (उच्च, मध्यम), त्याच्या भविष्यातील आवश्यकता आदी बाबींबर देखभालीची रक्कम ठरवली जाते, असे न्यायालयाने म्हटले आहे.