शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुत्र असावा तर पार्थ पवारांसारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 6:19 AM

साडेसोळा कोटींची मालमत्ता; शरद आजोबा-सुप्रिया आत्याला कर्ज

पुणे : पार्थ पवार. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या उच्चभ्रू वस्तीत पाच कोटी रुपये मोजून तब्बल १७ हजार १४० चौरस फुटांचा बंगला खरेदी केला.

शरद पवार हे पार्थ यांचे आजोबा. पंचाहत्तरी ओलांडलेल्या आपल्या आजोबांनाही या नातवाने पन्नास लाख रुपये कर्ज दिले आहे. एवढेच नव्हे तर जेमतेम वयाच्या अठराव्या वर्षी पार्थ यांनी मुळशीत सात लाख रुपयांची शेतजमीनही खरेदी केली आहे.

पार्थ यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय (कोणता ते नमूद केलेले नाही) आहे. बारामती, मुळशीत एकूण पाच हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन पार्थ यांच्याकडे आहे. लोकसभेची उमेदवारी दाखल करताना मंगळवारी (दि. ९) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पार्थ यांच्या मालमत्तेची माहिती समोर आली. पार्थ यांची स्वसंपादित संपत्ती १३ कोटी ६१ लाख ४९ हजार आहे. त्यांची वारसाप्राप्त संपत्ती सुमारे २ कोटी ८१ लाख ३५ हजार आहे.पार्थ यांनी त्यांची आत्या सुप्रिया सुळे यांनाही वीस लाख रुपये दिले आहेत.‘शेअर ट्रान्सफर’साठी ही रक्कम ‘अ‍ॅडव्हान्स’ म्हणून दिल्याचे म्हटले आहे. शरद पवारांनाही शेअर ट्रान्सफरसाठी पन्नास लाख रुपये दिले आहेत.आई आणि भावाचे कर्जपार्थ यांना त्यांची आई सुनेत्रा यांनी सुमारे ७ कोटी १३ लाख आणि भाऊ जय यांनी २ कोटी २३ लाख रुपये कर्जाऊ दिले आहेत. श्री छत्रपती साखर कारखाना, काट्याची वाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, कान्हेरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, बारामती सहकारी बँक लि., अजंठा कन्सॉलिडेटेड प्रा.लि. आणि सेंथिल जेडी डायग्नॉस्टिक प्रा. लि. या कंपन्यांचे शेयर्स पार्थ यांच्याकडे आहेत. तर प्रिन्स रियॅलिटी कन्सलटंट्स, जेपीपी युनायटेड, एव्हीए ग्लोबल लॉजिस्टिकस या कंपन्यांमध्ये त्यांची थेट गुंतवणूक आहे.

टॅग्स :maval-pcमावळSharad Pawarशरद पवार