स्रेहा मोरे,साहित्य संमेलन ट्रेनमधून८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी घुमानला रवाना होणारी गुरुनानक देवजी एक्स्प्रेस तब्बल अडीच तास उशिराने आली. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसवर साहित्यिकांसह सर्वच साहित्यप्रेमींना ताटकळत राहावे लागले.गेले काही दिवस साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनाच्या गोष्टी कानावर पडत असताना प्रत्यक्ष घुमानचा प्रवासच उशिराने सुरू झाला. त्यामुळे या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यास खास वेळ काढून आलेल्या पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनाही प्रतीक्षालयात बराच वेळ वाट पाहावी लागली. अखेरीस रात्री उशिरा प्रतीकात्मक पद्धतीने झेंडा दाखवून साहित्य संमेलनास शुभेच्छा देऊन त्यांनी काढता पाय घेतला. ३१ मार्चच्या मध्यरात्री १० वाजता सुटणारी ही एक्स्प्रेस मुंबईहून पावणेतीन वाजता सुटली.नियोजित वेळेनुसार पहाटे पाच वाजता पुण्यात पोहोचणारी ही एक्स्प्रेस तब्बल पाच तास उशिराने म्हणजे सकाळी १० वाजता पोहोचली. त्यामुळे पुण्यातील साहित्य रसिकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. पुण्यात या एक्स्प्रेसला शुभेच्छा द्यायला आलेले महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीही मध्यावरच स्थानकाहून परत फिरणे पसंत केले. त्यामुळे आयोजनाबाबत शंका उपस्थित करणाऱ्या चर्चांना उधाण आले.
‘घुमान’वारीच्या विशेष गाडीलाही उशीर
By admin | Published: April 02, 2015 5:03 AM