प्रवीण खेते, अकोलाऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश शुल्कात तब्बल ३५ वर्षांनी वाढ करण्यात आली असून, ही वाढ यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अतिरिक्त ‘प्रशिक्षण शुल्क’देखील भरावे लागणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेणारे विद्यार्थी हे मुख्यत्वे ग्रामीण भागातील असून, बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. शासनाने १४ मे रोजी यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे़ यापूर्वी आयटीआय प्रवेशासाठी १० रुपये ग्रं्रथालय शुल्क आणि ६०० रुपये वसतिगृह शुल्क आकारले जात होते; परंतु यंदा ग्रंथालय शुल्कात ९० रुपयांची तर वसतिगृह शुल्कात ६०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आता आयटीआयचे प्रशिक्षणही महागले!
By admin | Published: June 27, 2015 1:18 AM