शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

भाजपाला आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली - उद्धव ठाकरे

By admin | Published: February 18, 2017 8:24 PM

भाजपाची 'ती' जाहिरात पाहिली, ही कोणती संस्कृती आहे असे विचारत आता भाजपालाच 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ -  भाजपाची 'ती' जाहिरात पाहिली, ही कोणती संस्कृती आहे असे विचारत आता भाजपालाच 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. बीकेसीमधील जाहीर सभेते ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीकास्त्र सोडले. पुण्यातील मुख्यमंत्र्यांची आजची सभा पारदर्शी होती, लोक खुर्च्यांवर बसले होते, पण दिसतच नव्हते, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारला.
 
उद्धव यांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे : 
-  पुण्यातील मुख्यमंत्र्यांची आजची सभा पारदर्शी होती, लोक खुर्च्यांवर बसले होते, पण दिसतच नव्हते.
- टीका करायची असेल तर करा, पण माझ्या सोन्यासारख्या मुंबईची अवहेलना करू नका 
- आरोग्य शिबीरात मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार.
- भाजपला आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे.
- मुंबईत जोवर शिवसेना आहे तोवर मुबंई सुरक्षित राहणार.
- तुम्ही म्हणता की, औकात दाखवू, आमचे कपडे उतरवू, 23 तारखेला बघा मुंबईकर तुमचं काय करतात.
- कल्याण-डोंबिवलीला 6500 कोटी देऊ म्हणाले, अजून एकही रुपया दिलेला नाही.
- फडणवीस फक्त थापा मारत सुटले आहेत.
- जो  तुमच्या विरोधात बोलतो त्याला तुम्ही देशद्रोही ठरवता. 'सामना'ने यांना बेजार केलं आहे. त्यामुळेच बंदीची मागणी, ही आणीबाणी नाही तर काय?
- शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकता मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजूनपर्यंत 'भारतरत्न' का दिले नाही?
- 'राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!' हा टिळकांचा अग्रलेख सापडल्यास उद्या सामनामध्ये छापा.
- आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी तुमचं मंत्रीमंडळ किती बरबटलेलं आहे ते बघा आधी ! 
- मुंबईत जलबोगदे आम्ही केले, तुमच्या खालून हे बोगदे कधी गेले ते तुम्हाला कळलं देखील नाही !
- आम्ही जनतेच्या पैशाला कधी हात लावला नाही आणि लावणारही नाही !
- आम्ही जनतेच्या पैशाला कधी हात लावला नाही आणि लावणारही नाही !
- स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांतीकारकांचं दालन मुंबईत बनवणार 
- मोदींनी यांनी चरख्यावरुन गांधीजींना हटवलं आहेच. त्यामुळे मोदीच देशाचे राष्ट्रपिता होते असं जनतेला वाटेल.
- मोदी स्वत: 10 लाखाचा कोट घालतात आणि मनमोहन सिंह यांचं रेनकोट पाहतात.
- मी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा विरोध करणार आणि सत्यासाठी, चांगल्यासाठी भाजपचाही विरोध करणार .