डोंबिवली : कोर्टाच्या आदेशामुळे सगळ्यात वरच्या थरावर चढणाऱ्या बालगोविंदांचा आजच्या दहीहंडी उत्सवात विरस झाल्याचे पाहायला मिळाले. दहीहंडीच्या वरच्या थरावर चढू दिले जात नसल्याने सरावासाठीची मेहनत वाया गेली आहे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.कल्याण, काटेमानिवली येथील साईनाथ गोविंदा पथकातील राहुल कसब हा १२ वर्षांचा मुलगा म्हणाला की, हंडी फोडण्यासाठी एक महिन्यापासून सराव केला. मात्र, त्याला विठ्ठलवाडी येथील एका हंडीत सलामी देता आली. लागलीच स्थानिक पोलिसांनी वरच्या थरावर जाण्यास मज्जाव केला. त्याच पथकातील किसन गुप्ता यानेही तीच खंत बोलून दाखवली. नवयुग मित्र मंडळ पथकातील ऋषिकेश वायंगणकर याने सांगितले की, वर्षभर हंडीची वाट पाहिली. न्यायालयाच्या आदेशमुळे हंडी फोडता आली नाही. त्याचे वाईट वाटते. ओमसाई हनुमान मित्र मंडळाचा पार्थ पेडणेकर हा चार वर्षे सराव करीत आहे. सातव्या थरावर चढण्याचा सराव वाया गेला असे त्याने सांगितले.
वरच्या थरावरूनच फोडायची होती हंडी
By admin | Published: August 26, 2016 3:07 AM