शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

महिला दिनी ‘ती’ ठरली हुंडाबळीची शिकार, धक्कादायक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 7:12 AM

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन बबिताने प्रेमविवाह केला. मात्र, सासू-सासºयांना हुंडा देणारी सून हवी असल्यामुळे त्यांचाही या विवाहाला विरोध होता. लग्नाच्या काही दिवसांतच बबिताचा शारिरीक, मानसिक छळ सुरु झाला. ती चार महिन्याची गर्भवती राहिली.

- मनीषा म्हात्रेमुंबई - कुटुंबियांच्या विरोधात जाऊन बबिताने प्रेमविवाह केला. मात्र, सासू-सासºयांना हुंडा देणारी सून हवी असल्यामुळे त्यांचाही या विवाहाला विरोध होता. लग्नाच्या काही दिवसांतच बबिताचा शारिरीक, मानसिक छळ सुरु झाला. ती चार महिन्याची गर्भवती राहिली. अशातच पती आणि सासºयाने ५० हजार रुपयांच्या हुंड्यासाठी तिला मारहाण सुरुवात केली. यातून झालेल्या जखमांवर रुग्णालयात उपचार घेत असतानाच बबिताने महिला दिनी अखेरचा श्वास घेतला. एकविसाव्या शतकात मुंबईसारख्या शहरातही विवाहितेचा हुंड्यासाठी छळ होतोय ही धक्कादायक बाब आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली आकडेवारीही काहीशी बोलकी आहे. त्यामुळे महिला आपल्या राहत्या घरात तरी सुरक्षीत आहेत का, हाच सवाल येथे उपस्थित होतो. अशाच काहीशा मन हेलाऊन सोडणाºया गोष्टींचा हा आढावा...माटुंगा परिसरात आई, वडील आणि तीन भावंडासोबत २३ वर्षीय बबिता राहयची. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन गेल्या वर्षी मे महिन्यात शेजारच्या राजेश सिध्दराम बोडा याच्यासोबत प्रेमविवाह केला. मात्र, लग्नाच्या काही दिवसातच तिचा मानसिक, शारिरीक छळ सुरु झाला. माहेरून ५० हजार रुपये हुंडा घेऊन येण्यासाठी तिच्यामागे तगादा सुरु झाला. तिने याबाबत आई वडीलांना सांगितले. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखिची असल्याने त्यांना पैसे देणे शक्य नव्हते. तरीही शक्य तितके पैसे देऊ, असे सांगत बबिताच्या आई वडीलांनीही तिच्या सासरच्या मंडळींकडून थोडा वेळ मागितला.मात्र, बबिताला मारहाण सुरुच राहिली.मारहाणीला कंटाळून २५ जानेवारीला बबिताने पतिबाबत शाहू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत राजेशला समज दिली.अशातच बबीता चार महिन्याची गर्भवती राहिली. मात्र, तो काही नमला नाही. महिला दिनी पहाटेच्या सुमारास हुंड्याच्या रक्केमवरुन त्याने वाद घातला आणि बबिताला बेदम मारहाण सुरु केली. राजेशने तिचा गळा आवळला. यामध्ये तिची शुद्ध हरपली. तिला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान तिचा मत्यू झाला.याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी हुंडाबळी कायद्याअंतर्गत हत्येचागुन्हा दाखल करुन पतीसहसासºयाला अटक केली आहे.मात्र, या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. कित्येक महिला दरदिवशी अशा प्रकारातील शिकार ठरतआहेत. त्यामुळे यावर रोख आणणे गरजेचे आहे.मांडवातच दिला नकारमालाडमध्ये राहणाºया १९ वर्षीय गीताचे कळव्यातील आशिष मोहीलाल गुप्ता (२२) सोबत लग्न ठरले. साखरपुडा पार पडल्यानंतर ६ मार्चला लग्नाची तारीख ठरली. मांडव सजला. सुखी संसाराचे स्वप्न रंगवून गीता मांडवात बसली. वडिलांनी जमापूंजी तसेच कर्ज काढून दागिने, घरातील सर्व वस्तू भेटीत दिल्या.मंगळसूत्र घालण्यापूर्वीच सासूने हॉलसह, दिलेल्या भेट वस्तूंना नावे ठेवण्यास सुरुवात केली. ७० हजार रुपयांचा हुंडा द्या, नाहीतर लग्न मोडले म्हणून समजा, अशी धमकी दिली. वडीलांनी जावयासह सासू सासºयांचे पाय धरले. लग्न मोडू नका म्हणून विनंती केली. लगेच पैसे कुठून आणायचे. थोडा वेळ द्या.. अशी विनवणी सुरु झाली.नवºयाच्या आईने त्यांच्याच कानशिलात लगावत तेथून निघून गेले. आणि अवघ्या ७० हजार रुपयांच्या हुंड्यासाठी विवाह मोडला. गीताने हार न मानत मालाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीनुसार नवºयासह सासू-सासºयांना अटक करण्यात आली.वैचारिक क्रांतीहोणे गरजेचे....आजही हुंड्यासाठी महिलांचा बळी जातो ही खेदजनक आणि गंभीर बाब आहे. गेल्या ४३ वर्षापासून आम्ही या प्रथेविरुद्ध आवाज उचलत आहोत. कायद्यात कठोरता आहे. मात्र त्याबाबतचा धाक अद्याप त्यांच्यापर्यंत हवा तसा पोहचलेला नाही. आजही पैसे, फसवणूक, संशय यामुळे स्त्रीयांची छळवणूक होतच आहे. झटपट पैसा हवा म्हणूनच पालकच हुंड्याच्या माध्यमातून लग्नाचा घाट घालतात. कुठेतरी मुलीनेच हुंडा न घेणाºया जोडीदारालाच पसंती देणे गरजेचे आहे. लग्नानंतर अशी मागणी होत असेल तर तिने पोलिसांकडे धाव घ्यावी. याबाबत वैचारिक क्रांती होणे गरजेचे आहे.- आशा कुलकर्णी, महासचिव, हुंडाविरोधी चळवळ, मुंबईसमुपदेशनातून मिळाले पुन्हा जगण्याचे बळउच्चशिक्षित आणि चांगल्या पगारवाला म्हणून कुटुंबियांनी थाटामाटात नेहाचा (नावात बदल) राकेशसोबत विवाह लावून दिला. सुरुवातीचे काही दिवस छान गेले. त्यांना मुलगा झाला. अशात मुलगा सहा महिन्याचा असताना राकेशला परदेशात जाण्याचे वेड लागले. त्याने नेहाला माहेरून पैसे आणण्याची मागणी सुरु केली.तिने नकार देताच राकेशसह त्याच्या आई वडीलांकडून तिला मारहाण सुरु झाली. मात्र, ती पैसे न देण्यावर ठाम होती. मानसिक, शारिरीक अत्याचार सुरु झाले. छळाची परिसीमा म्हणजे तिचे केस कापून तिला विद्रूप केले गेले. शिवाय तिला वेडी ठरविण्याचाही प्रयत्न झाला. तिला मानसिक रुग्णाच्या रुग्णालयात भरती केले. ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांनी नेहाला स्वत:कडे बोलावून घेतले.नेहाची परिस्थिती पाहून कुटुंबियांनाही धक्का बसला. नेहाला घेऊन तिचे मामा आशा कुलकर्णी यांच्याकडे घेऊन आले. तिला यातून बाहेर काढणे कठीण होते. बरेच दिवस तिचे समुपदेशन त्यांनी केले. सध्या ती एका रुग्णालयात परिचारीका म्हणून कामाला आहे, तर मुलगाही चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहे. समुपदेशनामुळे तिला जगण्याची नवी दिशा मिळाली.

टॅग्स :Crimeगुन्हाDeathमृत्यू