विशाल शिर्के। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सायलेन्सर अथवा हॉर्नद्वारे कर्णकर्कश आव्वाज काढत गाडी दामटणाऱ्यांना गेल्या पाच वर्षांत तब्बल ७२ लाख रुपयांचे शुल्क ‘आवाजा’पोटी भरावे लागले असल्याची माहिती समोर आली आहे. प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांनी स्वतंत्रपणे कारवाई करीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही प्रशासकीय यंत्रणेकडे ध्वनिमापक यंत्र उपलब्ध नसतानाही, उपद्रवी वाहनचालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने गेल्या सहा वर्षांत केलेल्या कारवाईत ६ हजार ८२० वाहने दोषी आळली असून, त्यातील ६ हजार ५५१ वाहनांकडून ६१ लाख २२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक पोलीस शाखेने गेल्या सहा वर्षांत ३ हजार १८ वाहनांकडून १० लाख ८० हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सरासरी प्रत्येक वाहनाला एक हजार रुपये दंडाची शिक्षा होत असूनही कर्णकर्कश हॉर्न बसविण्याची अथवा सायलेन्सरमध्ये बदल करण्याचे प्रकार काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा वर्षांपैकी २०१४ आणि २०१५ या वर्षांत सर्वाधिक कारवाई झाली आहे. प्रादेशिक परिवहन विभागातील शहर, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत २०१४ मध्ये २ हजार ८९५ वाहने दोषी आढळली. त्यातील २ हजार ७०६ वाहनांवर कारवाई करून, त्यांच्याकडून २५ लाख ४२ हजार २००, तर २०१५मध्ये २ हजार ५६१पैकी २ हजार ५५९ वाहनांकडून २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.पोलीस आणि आरटीओकडून कारवाई करताना ध्वनीबरोबरच परवाना, कागदपत्रे, हेल्मेट, वाहन विमा अशा विविध बाबी देखील तपासल्या जातात. त्यामुळे दंडाच्या रकमेत आणखी वाढ होते. >मल्टीटोन (पाठोपाठ चित्रविचित्र आवाज करणारे) हॉर्न, असा जोराचा आवाज करणाऱ्या सायलेन्सरच्या गाड्या अशा वाहनांवर कारवाई केली जाते. बऱ्याचदा अशा वाहनांना वेगळा आवाज काढण्याची स्वतंत्र कळ असते. त्यामुळे अशा चालकांना पकडणे तुलनेने अवघड आहे. शहरात असे सायलेन्सर बसवून देणारे गॅरेजचालक असतील तर त्यांची नावे आरटीओला कळवावीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - विनोद सगरे, उपायुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग सायलेन्सर बदलणाऱ्यांवर कारवाई नाहीच काही विशिष्ट प्रकारच्या दणकट दुचाकींचे सायलेन्सर बदलून आवाज कडक करण्याकडे दुचाकीप्रेमींचा कल दिसून येत आहे. अनेकदा आरएक्स श्रेणीतील जुन्या दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये बदल करून वाहने दामटताना दुचाकीस्वार दिसतात. अशा प्रकारचे गाडीत बदल होऊ नयेत यासाठी काही कंपन्यांना अथवा तसा बदल करून देणाऱ्या गॅरेजचालकांवर कोणतेही बंधन प्रादेशिक परिवहन विभागाने अजून घातलेले नाही. तसेच अशा वाहनांवरदेखील कोणतीही कारवाई झाली नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी सांगितले.>पोलिसांची कारवाई वर्षदाखल केसतडजोड शुल्क२०१२१२९१,०६,६००२०१३८८८६,२००२०१४७९६७,१००२०१५४१५३,०३,४००२०१६२२३०५,१२,३००२०१७७७४५,५००(एप्रिल अखेर)एकूण३,०१८१०,८०,१००>प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कारवाई वर्षदोषी निकाली दंडवसुली वाहनेप्रकरणे२०१२-१३१८८१५२१,६५,७००२०१३-१४१००३९६२७,८२,३००२०१४-१५२,८९५२,७०६२५,४२,२००२०१५-१६२,५६१२,५५९२४,६०,०००२०१६-१७१६८१६७१,६७,०००२०१७-१८५५५०००(मे अखेर)एकूण६,८२०६,५५१६१,२२,२००
कर्णकर्कश आव्वाज पडला ७० लाखांना
By admin | Published: July 12, 2017 12:48 AM