पंकज रोडेकर, ठाणेकॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येपूर्वीच्या सुसाइड नोटमध्ये प्रामुख्यांनी २१ मुद्दे लिहले आहेत. तर त्यातील पान नंबर ४ वरील मुद्दा क्रमांक ११ वा प्रामुख्याने या प्रकरणातील चर्चेचा आणि तपासाची दिशा ठरवणारा मुद्दा ठरला आहे. तसेच ‘क्या जाने कल क्या होगा ’असे भावनिक लिहून त्यांनी जणू रात्रीची झोपच उडाल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. ठाण्यात प्रामुख्याने घडलेल्या आतपर्यंतच्या काही मोठ्या गुन्ह्यांत तपासाला दिशा देणारी ही डायरी किंवा तिची पानेच महत्त्वाची ठरली आहेत. मग ती शीळ-डायघर इमारत दुर्घटना असो किंवा बारवरील कारवाई असो. जवळपास या घटनांमध्ये डायरी किंवा त्याची पानेही लेखी पुरावेच बनली आहेत. त्याप्रमाणे परमार आत्महत्येत त्यांची सुसाइड नोटच तपासात निर्णयक ठरणार आहे.परमार यांनी स्वत:ला गोळी झाडून घेण्यापूर्वी पाठत्तपोठ डायरीची १० पाने लिहून ठेवली आहेत. चिठ्ठीची सुरुवात करताना गव्हर्नमेंट असे उल्लेख करीत डीअर सर,असेही म्हटले आहेत. त्यांनी डायरीतील पान नंबर ४ वरील मुद्दा क्रमांक ११ मध्ये लिहिलेली नावे खोडली असून त्याखाली लिहिलेल्या टीपमध्ये त्यांच्यामुळे आपल्या कुटूंबियांना त्रास होईल, अशी भीती केली आहे. ही खाडाखोड दोन लाईनींवर केलेली आहे. या खाडाखोडीमागे कोण आहे? आणि ते परमार यांच्या कुटुंबियांना का त्रास देतील. याच गांभीर बाबी लक्षात घेऊन ती सुसाइड नोट फॉरेन्सिक लॅबला पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असावा. ती खाडाखोडच याप्रकरणाची दिशा निश्चित करणारी ठरणार आहे.त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधा असे शासनाकडून सांगण्यात येते. ती बांधण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या घेण्यासाठी किती त्रास होतो. तसेच त्यामध्ये बरेच पैस खर्च होतात. असे निदर्शनास आणून देताना ‘क्या जाने कल क्या होगा ’असे म्हणून रात्रीची झोपच उडाली आहे, असेही त्यांनी नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता अहवाल आल्यानंतरच सत्य काय ते समजणार आहे.
तो मुद्दा तपासाची दिशा ठरवणार
By admin | Published: October 17, 2015 3:14 AM