शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कर्ज काढावेच लागेल..!

By admin | Published: October 30, 2015 1:17 AM

सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात राज्यात नवे कर लावण्याची मर्यादा आता संपत आली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीचे नवनवे मार्ग शोधावेच लागतील. नवीन काही करायचे असेल तर पैशांची गरज लागणारच आहे

सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात राज्यात नवे कर लावण्याची मर्यादा आता संपत आली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीचे नवनवे मार्ग शोधावेच लागतील. नवीन काही करायचे असेल तर पैशांची गरज लागणारच आहे. त्यामुळे सध्या तातडीची गरज म्हणून राज्याला ५ हजार कोटींचे कर्ज काढावेच लागेल. क्लब, सोसायटीसाठी घेतलेल्या शासनाच्या जमिनीचा २० टक्केपेक्षा जास्त वापर जर व्यावसायिक कारणासाठी केला जात असेल तर त्यांच्याकडूनही पैसे घ्यावे लागतील.झालेल्या कारभाराविषयी काय सांगाल?खूप आमूलाग्र बदल झाले असा आमचा दावा नाही. सत्तेवर येताना जी आश्वासने दिली होती त्याचे ओझे खूप आहे. यापुढच्या काळात घोषणा करताना खूप विचार करावा लागेल. राज्यावर ३ लाख ३० हजार कोटींचे कर्ज आहे. टोलमाफीची घोषणा, एलबीटीबद्दल बोललो होतो. दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे समाधान आहे; पण यापुढे तिजोरीचा विचार करूनच निर्णय घ्यावे लागणार आहेत.टोलमाफीवर तुम्ही सहमत आहात का? मी सहमत नव्हतो आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील सहमत नाहीत. टोल लावण्याच्या निर्णयामागे विचार होता. टोल असेपर्यंत रस्त्यांची देखभाल ठेकेदारांकडे होती. आम्ही टोलमाफी केल्याने संबंधित ठेकेदारांना काही रक्कम आम्हाला द्यावी लागली आणि उद्यापासूनच त्या रस्त्यांची दुरुस्तीदेखील आमच्यावर येऊन पडली. टोलच्या निर्णयावर समाजात जागृती निर्माण केली पाहिजे असे माझे मत आहे. आम्हाला चांगले रस्ते हवे असतील तर पैसे द्यावे लागतील. तुम्ही कर्ज काढावे लागेल असे सांगता. आधीच एवढे कर्ज राज्यावर आहे...आघाडी सरकारने अत्यंत बेशिस्त कारभार केला. तीन लाख कोटींचे कर्जही त्यांनीच करून ठेवले आणि रिकामी तिजोरी आम्हाला दिली. सिंचनासाठी आम्हाला पैसे लागणार आहेत. जीएसटीचा कायदा मंजूर झाला नाही त्यामुळे सगळ्याच राज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. १४व्या वित्त आयोगानुसार पगार देण्याचे मोठे आव्हान आहेच. मोठे बदल घडवून आणायचे असतील तर पैसे लागणारच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि आम्हा ज्येष्ठ मंत्र्यांची यावर चर्चा झाली आहे. आजतरी किमान ५ हजार कोटींचे कर्ज काढावेच लागेल. कदाचित हा आकडा जास्तीचाही असू शकतो.दुष्काळावर मात करण्यासाठी पैसा किती व कसा आणणार?गेली तीन वर्षे निसर्ग आमच्यावर रुसला आहे. गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारने दुष्काळ जाहीर केलेला नव्हता; मात्र आम्ही १४,७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यांना मदत देणेही सुरू केले आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे आहे. आम्ही १ कोटी ३७ लाख खातेदार शेतकऱ्यांचा अपघात विमा काढला आहे. दुर्दैवाने काही झाले तर त्यांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये मिळतील; शिवाय ३३० रु. भरून आयुष्यभर विमा संरक्षण देण्याचे काम आम्ही केले ज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही त्यांच्या नातेवाइकांना मदत मिळेल अशी तरतूद केली आहे. सर्व शेतकऱ्यांना ५० टक्के सबसिडीवर तसेच मागासवर्गीय आणि आदिवासींना ७५ टक्के सबसिडीवर गाई, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या देण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे. पण गोवंश हत्या बंदीमुळे वेगळे प्रश्न निर्माण होत आहेत, त्याचे काय?गेल्या १० वर्षांत पशूंची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. दर १०० पशूंमागे ती ७८वर आली आहे. भाकड गायी, भाकड जनावरांचे काय असे प्रश्न आहेत; पण माणूस काय व जनावरे काय, कधीतरी त्यांना मरण येणारच आहे. म्हणून हत्या करणे योग्य नाही. अनेक एनजीओ पुढे आल्या आहेत ज्यांनी गाय, बैल दत्तक घेणे सुरू केले आहे. जैन समाजाने यात मोठा पुढाकार घेतला आहे. पुण्याजवळ एका जैन धर्मगुरूंनी फक्त जागा मागितली, बाकी सगळा खर्च ते करत आहेत. त्यामुळे गोवंश हत्या बंदीचा निर्णय योग्यच आहे.