मुंबई - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मुंबईसह महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान राज्यात ठिकठिकाणी हवामानात बदल होतील आणि पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
११ ते १४ डिसेंबरपर्यंत असे चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम नाशिक, खान्देश ओलांडून मध्य प्रदेशाच्या बेतुल, बऱ्हाणपूर, देवास, होशंगाबाद, मांडला व छत्तीसगडच्या काही भागापर्यंत जाणवू शकतो. दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढलेले किमान तापमान व ढगाळ वातावरण पुढील ४-५ दिवस तसेच राहील, असे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.