शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

शहीद जवानांच्या नावाने मोदींनी मत मागणे चुकीचेच : विक्रम गोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 7:05 PM

जर मोदींना पुलवामा आणि शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर देणे योग्य आहे. मात्र, मते वाढावीत म्हणून पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा वापर करू नये.

पुणे : मी कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. मी केवळ जवान आणि शेतक-यांशी बांधील आहे, अशी स्पष्टोक्ती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या नावाने मत मागणे चुकीचेच आहे, अशा शब्दातं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मोदींना कानपिचकी मारली. तर दुसरीकडे दुष्काळाचे खापर सत्ताधा-यांवरफोडणे हे देखील चुकीचे आहे असा टोला विरोधकांना लगावत सरकारची पाठराखण केली. विक्रम गोखले अ‍ॅक्टिंग व अ‍ॅकडमी आणि एचआर झूम यांच्यातर्फे १९ मे रोजी अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे विक्रम गोखले अभिनय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोखले बोलत होते. गोखले म्हणाले, जर मोदींना पुलवामा आणि शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर देणे योग्य आहे. मात्र, मते वाढावीत म्हणून पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा वापर करू नये. हवामानातील बदल काही सत्ताधा-यांनी सांगितले म्हणून होत नाहीत. त्यामुळे उष्माघात, दुष्काळ आणि पूर अशा संकटांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार कसे? प्रत्येक गोष्टीमध्ये सत्ताधा-वर खापर फोडणे चुकीचे आहे. राजकारणातील अभिनेत्यांच्या सहभागाविषयी विचारले असता ते पुढे म्हणाले, अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्ती राजकारणात यशस्वी होतील याची शाश्वती नसते. आमचे बच्चन साहेब राजकारणात गेले. नंतर त्यांना त्याचा पश्चात्ताप झाला.आमच्या पक्षात या म्हणून अनेकवेळा मलाही आग्रह झाला. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाशी मी बांधील नाही. सर्वच राजकीय पक्षांमध्ये माझे मित्र असल्यामुळे मी कोणत्याच पक्षामध्ये दाखल झालो नाही. मात्र, चांगला राजकीय पुढारी होण्यासाठी योग्य अभ्यास असणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या राजकारणाचा व्यवसाय झाला आहे. भाऊ, दादा, साहेब अशी बिरुदं लावून ज्यांच्यामागे आपण धावतो त्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की रणांगणात जाण्याची वेळ येते तेव्हा नेते घरी असतात आणि लाठया-काठया मुलांना खाव्या लागतात...................................

टॅग्स :PuneपुणेVikram Gokhaleविक्रम गोखलेIndian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदी