शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
2
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
3
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
4
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
5
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
6
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
7
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
8
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
9
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
10
देशातील सर्वात मोठ्या IPO ला SEBI चा हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी येणार Hyundai Motors च्या इश्यू
11
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
12
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?
13
मविआतील पक्षांना अक्षय शिंदेचा पुळका आलाय; भाजपाचा घणाघात, उद्धव ठाकरेंवरही टीका
14
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
15
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
16
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
17
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
18
पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचे निधन, ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
20
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)

आयटीआयच्या प्रवेश शुल्कात कपात

By admin | Published: November 15, 2015 2:08 AM

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ केल्याने सर्वच स्तरातून त्याला विरोध झाला

मुंबई : राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ केल्याने सर्वच स्तरातून त्याला विरोध झाला. या विरोधानंतर अखेर शासनाने आयटीआयच्या प्रवेश शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेले संस्था विकास शुल्कही परत येण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी आॅगस्ट २0१५ या शैक्षणिक सत्रापासून होणाऱ्या प्रवेशासाठी शुल्क वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयाविरोधात स्टुटुंट फेडरेशन आॅफ इंडिया आणि आयटीआयचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. याची दखल घेत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने अध्यादेश काढून शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्था विकास शुल्काच्या नावाखाली घेण्यात येणारे एक हजार रुपयांचे शुल्क रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले एक हजार रुपयांचे संस्था विकास शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले संस्था विकास शुल्क तातडीने परत करण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक (प्रशिक्षण) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात संस्था विकास शुल्क दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची रक्कम परत मिळणार आहे.