शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे झाला विजयचा जन्म, नव्हे दुसऱ्या दुग्धक्रांतीचाच जन्म

By अोंकार करंबेळकर | Published: August 23, 2017 2:36 PM

भारतात आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायजेशन- कृत्रिम गर्भधारणा) तंत्रज्ञानाच्या मदतीने विजय नावाचे वासरू रविवारी पहाटे जन्माला आलं.

ठळक मुद्देपठाण यांच्या फर्ममधील रतन नावाच्या गीर जातीच्या गायीचे अफलित अंडबिज या प्रयोगासाठी वापरण्यात आले. भारतात आयव्हीएफ (कृत्रिम गर्भधारणा) तंत्रज्ञानाच्या मदतीने विजय नावाचे वासरू रविवारी पहाटे जन्माला आलं

मुंबई, दि.23- रविवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एक आनंदाची बातमी घेऊन आली. भारतात आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायजेशन- कृत्रिम गर्भधारणा) तंत्रज्ञानाच्या मदतीने विजय नावाचे वासरू रविवारी पहाटे जन्माला आलं. विजयच्या रुपाने आपल्या देशाची दुसऱ्या दुग्धक्रांतीकडे पावलं पडत आहेत.

डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या जे. के. ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. श्याम झंवर, डॉ. रमाकांत कौशिक आणि त्यांच्या टीमने आयव्हीएफ पद्धती आर. जे. पठाण व माजिदखान पठाण यांच्या रचना खिल्लार फर्मवर यशस्वी करुन दाखवली आहे. या तंत्रज्ञानामुळे जन्माला आलेल्या गीर जातीच्या या वासराचे नाव विजय असे ठेवण्यात आले आहे. डॉ. लक्ष्मणराव असबे, मिलिंद देवल, अप्पासो पाटील, डॉ. संजय शिंदे, जुबेर पठाण या सर्वांच्या मदतीने हा प्रयोग करण्यात आला. 

इंजिनिअर आणि देशी गाय

कृत्रिम गर्भधारणेचा उपयोग करुन भारतामध्ये हर्षा चावडा या मुलीचा 1986 साली जन्म झाला. आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरण्याची भारतातील ही पहिलीच वेळ होती. डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी हे तंत्रज्ञान भारतामध्ये यशस्वी करुन दाखवले होते. आता हेच तंत्रज्ञान दुग्धउत्पादन वाढवण्यासाठी आणि देशी गोवंश वाचवण्यासाठी गायींच्या कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरले जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते एक आयुष्यभरामध्ये (सरासरी 15 वर्षे) 10 वासरांना जन्म देऊ शकते. पण आयव्हीएफमुऴे एका वर्षात 20 वासरांना जन्म दिला जाऊ शकतो म्हणजेच एका आयुष्यभरात गाय 200 वासरांना जन्म देऊ शकेल.

कशी करण्यात आली गायीची कृत्रिम गर्भधारणा?

पठाण यांच्या फर्ममधील रतन नावाच्या गीर जातीच्या गायीचे अफलित अंडबिज या प्रयोगासाठी वापरण्यात आले. हे बिज प्रथम इन्क्युबेटरमध्ये काही तासांसाठी ठेवण्यात आले त्यानंतर गीर जातीच्याच नराच्या वीर्याशी त्याचा संयोग घडवून आणण्यात आला. 7 दिवसांनंतर त्याचे रुपांतर प्राथमिक अवस्थेतील गर्भामध्ये झाले. हा गर्भ त्यानंतर दुसऱ्या मादीमध्ये ठेवण्यात आला. ही सगळी प्रक्रिया नोव्हेंबर 2016 मध्ये करण्यात आली होती. रतनप्रमाणे इतर तीन गायींची बिजेही कृत्रिम गर्भधारणेसाठी गोळा करण्यात आली होती, त्यामधील एक गाय गीर व दोन खिलार गायी होत्या. लवकरच या गायीही प्रसूत होण्याची शक्यता आहे.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचे मानकरी

रजाक जब्बार पठाण यांना गोवंशवृद्धी आणि खिल्लाराची पैदास यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या लोकमत समुहाद्वारे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गायींवर आईसारखी माया करतानाच गाय हा एक उपयुक्त पशू असल्याचे तत्वज्ञान कृतीतून सिद्ध करणारा माणूस. गाय कसायाघरी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या दारी जाईल, यासाठी त्यांनी भगिरथ प्रयत्न केले आहेत. उत्तम जातिवंत देशी गायींच्या पैदाशीसाठी कार्यरत. आदर्श मुस्लीम गोपालक आणि अकाली वैधव्य आलेल्या शेतकरी महिलांना आधार देणारा भाऊ अशी रज्जाक पठाण यांची ओळख आहे.जातीवंत देशी गोधनाच्या निर्मितीची गरज ओळखून गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या गोठ्यात अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम अखंड चालू आहे. गेल्या दोन दशकांच्या प्रयत्नातून २४ तासात १२ लिटर दुध देणारी खिल्लार व २८ लिटर दुध देणार गीर गायीची प्रजाती सिद्ध केल्या आहेत.  जातीवंत जनावरांच्या पैदाशीसाठी उत्कृष्ट वळूंचीही पैदास तेथे होते. त्याचा लाभ इतर गोशाळांनाही झाला आहे. १५० पेक्षा जास्त गायी वासरांच्या या गोतावळ्यात  बैलपोळा रमजान पेक्षाही जास्त उत्साहाने साजरा होतो. येथे ६५० अकाली शेतकरी विधवा महिलांची भाऊबीज साजरी केली जाते. त्यांच्या ७७४ मुला-मुलींचे मुलांच्या  शिक्षणाचा पूर्ण खर्च केला जातो. दिवसाकाठी निदान ४० ते ५० शेतकरी व गोपालकांना दूध,शेण, गोमूत्र यांचे महत्व पटवून देणारा प्रशिक्षण कार्यक्रम अव्याहत सुरू असतो. आजवर १२५ शेतकऱ्यांना देशी गायींचा पुरवठा त्यांनी केला आहे. तसेच १२ एकरांची बाग सहा महिने गायी-गुरांना चरण्यासाठी खुली केली. त्यातून गुरांना आयुर्वेदिक वनस्पतींचा आहार आणि त्याच गायींचे शेण व गोमूत्र यांच्यापासून जीवामृत व दशपर्णी अर्क बनवून पिकांसाठी वापर त्यांनी केला आहे.

टॅग्स :Indiaभारत