शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

‘जे. जे.’मध्ये अत्याधुनिक स्कॅन मशीन

By admin | Published: October 06, 2014 4:59 AM

एमआरआय, सीटी स्कॅन करायला सांगितले की, काही जणांना घामच फुटतो. मात्र मुंबईकरांची चिंता आता कमी होणार आहे.

पूजा दामले, मुंबईएमआरआय, सीटी स्कॅन करायला सांगितले की, काही जणांना घामच फुटतो. मात्र मुंबईकरांची चिंता आता कमी होणार आहे. भायखळा येथील सरकारी जे. जे. रुग्णालयामध्ये एमआरआय, सीटी स्कॅन करण्यासाठी नवीन ३ टेस्ला स्कॅन मशीन आणले आहे. येत्या १० आॅक्टोबरपासून या मशीनचा वापर सुरू होऊ शकतो. यामुळे अत्यल्प दरामध्ये चांगल्या प्रतीची तपासणी रुग्णांना करून मिळणार आहे.मुंबईतील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये १.५ टेस्ला स्कॅन मशीन वापरण्यात येते. पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञान, जास्त रेझोल्युशन असणारे हे ३ टेस्ला स्कॅन मशीन जे. जे. रुग्णालयात बसविले आहे. या मशीनचे फक्त रेझोल्युशनच चांगले नाही, तर या मशीनमुळे तपासणीसाठी लागणारा वेळदेखील कमी होणार आहे, असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. १.५ टेस्ला स्कॅन मशीनमध्ये संपूर्ण शरीराची तपासणी करून घ्यायची असल्यास ४५ ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र ३ टेस्ला स्कॅन मशीनमध्ये संपूर्ण शरीराची तपासणी ही फक्त अर्ध्या तासात पूर्ण होईल. मशीनमध्ये आत गेल्यावर कानात येणारा आवाज, कानाला दडे बसणे, असे प्रकार घडतात. म्हणून रुग्णाला इअरफोन देऊन गाणी ऐकायला देणार आहेत. ही मशीन मोठी असल्यामुळे त्यात रुग्णाला घुसमटल्यासारखे होणार नाही. तसेच रुग्णाला या खोलीत आल्यावर भीती वाटणार नाही, अशी या खोलीची रचना केल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)