शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

जहांगीर कलादालनाचे संकेतस्थळ बंद

By admin | Published: July 12, 2017 1:58 AM

मुंबईतील जहांगीर कलादालनाचे संकेतस्थळ दोन महिने उलटूनही बंद असल्याने कलाकार-कलारसिकांची प्रचंड गैरसोय होते आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरातील प्रसिद्ध कलादालनांमध्ये गणले जाणारे मुंबईतील जहांगीर कलादालनाचे संकेतस्थळ दोन महिने उलटूनही बंद असल्याने कलाकार-कलारसिकांची प्रचंड गैरसोय होते आहे. दोन महिन्यांपूर्वी या कलादालनाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते, मात्र त्यानंतर काही काळ संकेतस्थळाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचा संदेश त्यावर दिसत होता, परंतु आता हे संकेतस्थळ बंद झाले आहे. त्यामुळे कला क्षेत्रातून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. जहांगीर कलादालनात आयोजित कलाप्रदर्शनांची माहिती आणि भविष्यातील कलाप्रदर्शनांची माहिती यावर दिसत असे. मात्र दोन महिन्यांपासून हे संकेतस्थळ बंद असल्याने प्रदर्शनांची माहिती पोहोचण्यात खंड पडला आहे. या ठिकाणी कलाप्रदर्शन आयोजित करण्यासाठी दीड वर्षापूर्वी बुकिंग केले जाते. शिल्प-चित्र क्षेत्रातील अनेक कलाकारांकडून या संकेतस्थळाला दररोज भेट दिली जाते, परंतु हे संकेतस्थळ बंद झाल्याने प्रदर्शनांना त्याचा फटका बसत आहे.याविषयी जहांगीर कलादालन कार्यालयाच्या अधिकारी कार्थियानी मेनन यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, संकेतस्थळ बंद आहे. नवीन संकेतस्थळाचे काम पूर्ण झाले आहे. आज (बुधवारी) होणाऱ्या बैठकीत संकेतस्थळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या संकेतस्थळाची प्रायोजक टाटा कंपनी आहे. संकेतस्थळ सुरू करण्यासाठी टाटा कंपनीकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. याचे सर्व निर्णय बैठकीत घेतले जातील. मात्र टाटा कंपनीने प्रायोजकत्वास नकार दिल्यास दुसरा प्रायोजक शोधावा लागेल, असेही मेनन यांनी स्पष्ट केले.