शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

बाळाच्या नशिबी आले कारागृह!

By admin | Published: January 01, 2015 2:35 AM

कुठलाही गुन्हा नसताना या शिक्षेचा भागिदार होण्याची वेळ आलीय ती एका निरागस निष्पाप नऊ महिन्यांच्या चिमुरड्यावर !

शिक्षा भोगणारी आजी करतेय संगोपन : सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी शिक्षानीलेश शहाकार- बुलडाणाआईने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली... वडील अपंग आणि आजोबा दृष्टीहीन, आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात आजी शिक्षा भोगतेय. अशा विपरीत परिस्थितीत कुठलाही गुन्हा नसताना या शिक्षेचा भागिदार होण्याची वेळ आलीय ती एका निरागस निष्पाप नऊ महिन्यांच्या चिमुरड्यावर ! संवेदनशील माणसाच्या हदयाला पाझर फोडणारे हे वास्तव आहे, बुलडाणा जिल्हा कारागृहातील. जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कनकखुर्द येथील प्रमिला वसंत जाधवने मुलाच्या लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात सुनेचा हुंड्यासाठी छळ सुरु केला. या छळाला कंटाळून या बाळाचाही विचार न करता विवाहितेने आत्महत्या केली. तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने सुनेचा छळ आणि हत्येस कारणातून ठरवून आजी प्रमिला जाधवसह कुटूंबातील चार सदस्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली व १२ डिसेंबर २०१४ ला कारागृहात रवानगी केली. अपंग वडील व दृष्टीहीन आजोबा नऊ महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्याने त्याला सांभाळण्याची जबाबदारी आजीवर आली. च्आजीसोबत दुधाचे ओठही न सुकलेल्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने कारागृहातील दगडी भिंतीनाही मायेचा पाझर फोडला आहे. कर्तव्यकठोर पण माणुसकीच्या नात्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्या बाळाच्या आरोग्याची काळजी सतत सतावत असते. कारागृहातील नियम पाळतानाच दर पाच दिवसांनी बाळाची आरोग्य तपासणी व आवश्यक ती औषधी त्याला दिली जाते. नऊ महिन्यांच्या बाळासाठी कपडे व खेळणी पुरविले जातात. शिवाय या चिमुकल्याशी सर्वांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. शेवटी कर्तव्यासमोर काही गोष्टी बाजूला ठेवाव्याच लागतात आणि नियम व कायद्याचे पालनही करावे लागते. — आशिष गोसावी, कारागृह पोलीस अधीक्षक बुलडाणा.