लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी सिंचन क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या ‘जैन इरिगेशन’चे इस्त्रायलसोबत २६ वर्षांपासून दृढ व्यावसायिक संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्त्रायलच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त ‘जैन इरिगेशन’ व इस्त्रालय यांच्यातील दृढ संबंधाला नवीन उजाळा मिळाला आहे.इस्त्रायलसोबत ‘जैन इरिगेशन’चे १९९१ पासूनचे व्यावसायिक संबंध आहेत. कंपनीचे संस्थापक दिवंगत भवरलाल जैन यांच्या कल्पनेने शेतकऱ्यांना तेथील कृषी प्रदर्शन, संमेलनासाठी पाठविले जात होते. १९९२-९३ व २००७ मध्ये ते स्वत: नानदान कंपनीचे अधिग्रहण झाले त्यावेळी ते इस्त्रायलला गेले होते. त्यानंतर नानदान-जैन अशी वैश्विक ओळख जैन इरिगेशनने निर्माण केली.भारतीय शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेता २००७ मध्ये नानदान इरिगेशन या प्रसिद्ध कंपनीचे २१.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करुन जैन इरिगेशनने अधिग्रहण केले. त्यामुळे नानदान-जैन ही जगात क्रमांक दोनची कंपनी ठरली. आता ही कंपनी भारतीय शेतकऱ्यांना किफायतशीर दरात अत्याधुनिक उत्पादने उपलब्ध करुन देत आहे. अमेरिका, युरोप, आॅस्ट्रेलिया, आफ्रिका खंडातील देशांमध्ये कंपनीची उत्पादने पोहोचत आहेत.इस्त्रायलने जगाला ठिबक सिंचनाची देणगी दिली आहे. त्याचीच प्रेरणा घेऊन हे तंत्रज्ञान भारतीय शेतीमध्ये भवरलाल जैन यांनी आणले. त्यासाठी भारतातील कृषी तंत्रानुसार बदल करुन ठिबक सिंचन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविले.‘मोअर क्रॉप पर ड्रॉप’ ही संकल्पना रुजविली ती जैन इरिगेशनने. शेतकऱ्यांच्या प्रती जैन इरिगेशनची असलेली भावना लक्षात घेता पंतप्रधानांच्या दौऱ्यात कंपनीचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जैन यांनाही निमंत्रित करण्यात आले. निश्चितच या दौऱ्यातून कृषी क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय ६ जुलैच्या इस्त्रायल येथील बैठकीत होतील, अशी आशा आहे. - अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव.
इस्त्रायलसोबत ‘जैन इरिगेशन’ची २६ वर्षांपासून मैत्री
By admin | Published: July 06, 2017 4:10 AM