हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : गेली ५३ वर्षे जव्हारकरांची तृष्णा भागवत असलेल्या जयसागर धरणाचे उदघाटन भाद्रपद शुद्ध ४ शके १८८३ श्री गणेश चतुर्थी, दिनांक १४ सप्टेंबर १९६१ रोजी जव्हारचे राजे नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे शुभहस्ते झाले होते. आणि जव्हारकरांची पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबली. त्यावेळेच्या ६ हजार लोकसंख्यसाठी बांधण्यात आलेले धारण असल्याने वाढत्या जव्हार शहरातील लोकसंख्येसाठी चिंतेची बाब बनत चालली होती. हे लक्षात घेवून जव्हार नगरपरिषदेने जय सागर धरणाचे नूतनीकरण करून पाणीसाठा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या जव्हार शहरातील जय सागर धरणावर पर्यटकांची गर्दी होतांना दिसत आहे. जव्हारच्या शहराला लागुनच १ कि.मी. अंतरावर झरिपा नावाचा, अनेक जिवंत झरे असलेल्या नाल्यावर हे धरण बांधण्यात आले आहे. तो ४०० फुट लांब व सुमारे ६० ते ६५ फुट उंचीचे हे धरण आहे. जव्हारच्या विकासाच्या व नागरी सुविधांच्या विविध संकल्पनांसह जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी धरण असावे असे स्वप्न जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी १० जून १९४८ साली जव्हार संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करतांना त्यांनी धरण बांधणेसाठी रु .५ लक्ष एवढा निधी राखून ठेवला व तो जव्हार नगरपालिकेकडे सुपूर्द केला होता. पुढे महाराष्ट्र शासनाने आवश्यक असलेला उर्विरत रु . ७,२७,१५८.०० इतका निधी धरण बांधणे कामी उपलब्ध करून दिला होता. जि.प. व जव्हार नगरपरिषदेच्या सहकार्याने जयसागर धरणला लागून असलेल्या गार्डनचे नूतनीकरण करण्यात आले असून जयसागर धरणाला जाण्यासाठी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. धरणाजवळ असलेल्या गार्डनमध्ये नवीन गवताळ लावले असून, खुला रंगमंच, धरणामगील दरी बघण्यासाठी रेलिंग ही लावण्यात आले आहे, तसेच बच्चे कंपनी साठी खेळणी ही लावण्यात आली आहे. जयसागर धरणाचे नूतनीकरण केल्यामुळे नागरिक मोठया प्रमाणात धरणाला भेट देत आहेत. नूतनीकरण केल्यामुळे धरणाचा परिसर अत्यंत सुंदर झाला आहे.- पारस संजय सहाणे, पर्यटनप्रेमी, जव्हार.जयसागर धरण बागेचे नूतनीकरण झाले.
जव्हारच्या जयसागर धरणाचे झाले नूतनीकरण
By admin | Published: July 12, 2017 3:08 AM