शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

जयस्वाल हत्या पैशांसाठी ?

By admin | Published: December 22, 2014 5:03 AM

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांच्या मारेकऱ्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे

नवी मुंबई : बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांच्या मारेकऱ्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यांची हत्या आर्थिक व्यवहारातून घडवून आणल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.खारघर येथे राहणाऱ्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्ष मीनाक्षी जयस्वाल यांची शुक्रवारी भरदिवसा राहत्या घरी हत्या झाली. घटनेनंतर पोलिसांनी काहीच तासांतच दोघांना अटक देखील केली आहे. विनायक चव्हाण आणि मनिंदरसिंग बाजवा अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. चव्हाण हा जयस्वाल कुटुंबीयांच्या परिचयाचा होत्या. त्यांनीच हत्या घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे. मीनाक्षी जयस्वाल यांच्याकडून चव्हाण याने उसने पैसे घेतले होते. ही रक्कम मोठी असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यापैकी काही रकमेची त्याने परतफेड केली होती. मात्र उर्वरित रक्कम देखील लवकर परत देण्याची मागणी जयस्वाल चव्हाण याच्याकडे करत होत्या. याच रागातून चव्हाण याने मनिंदरसिंग बाजवा व फरार साथीदार यांच्या मदतीने जयस्वाल यांची हत्या घडवल्याचे समजते. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही. परंतु आर्थिक कारणामुळे हत्या झाल्याच्या वृत्ताला खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील दुजोरा यांनी दिला आहे. जयस्वाल यांच्या घरातील रक्कम चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आरोपींना त्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांचा खून करून, रक्कम घेऊन बाजवा याचा साथीदार पसार झाल्याचे समजते. परंतु तपासात अद्याप हे समोर आली नसल्याचे उपआयुक्त संजयसिंह येनपुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)