- नम्रता भोसले, खटाव (सातारा)खटावपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खातगुण गावात सय्यद कुटुंबात ‘देवीच्या भक्तीचा जागर’ यंदा सुवर्ण महोत्सवी ठरला आहे. नवरात्रौत्सवात दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना करून, नऊ दिवसांची उपासना करण्याचे कार्यही मोठ्या भक्तिभावाने तिसरी पिढी करत आहे. खातगुणमध्ये पै. अहंमद रसूल सय्यद (मामू) यांनी १९६५पासून त्या काळच्या कर्मठवादी समाजाचा, प्रसंगी त्रास सहन करूनही हिंदूंचे सण साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरीच दत्तजयंती, दुर्गामातेचा उत्सव सुरू केला. या उत्सवकाळात नित्यनियमाने काकड आरतीसह सकाळ-सायंकाळी देवीची आरती केली जायची. त्यांचे निधन झाल्यानंतरही पुढच्या पिढीनेही हीच परंपरा भक्तिभावाने कायम ठेवली. त्यांच्या पश्चात त्यांचे पुतणे शब्बीर बाबालाल सय्यद, तसेच त्यांच्या पत्नी शबाना यांनी हा वारसा जपला आहे. या नवरात्रौत्सवात देवीचे उपवास या दोघांकडून धरले जातातच, त्याचबरोबर संपूर्ण उत्सवकाळात काकड आरतीपासून सुरुवात होऊन, रात्री जागरपर्यंत सर्व धार्मिक विधी नित्यनियमाने केले जातात.खातगुणमध्ये माझ्या चुलत्यांनी ही प्रथा सुरू केली. त्या वेळचा काळ व समाज अतिशय कडक होता, तरीही त्यांनी त्यांना न जुमानता, खातगुणमध्ये घरी देवी बसवण्याची पद्धत सुरू केली. सुरुवातीला लहान मूर्तीची प्रतिष्ठापना केली, आता मोठी मूर्ती बसवली जाते. - शब्बीर सय्यद
सय्यद कुटुंबात देवीभक्तीचा सुवर्ण महोत्सवी जागर!
By admin | Published: October 18, 2015 2:19 AM