शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

Corona Vaccination: खळबळजनक! लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही दोन आरोग्य अधिकारी झाले पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 1:53 PM

Corona Vaccination in Jalana District: राज्यासह जिल्ह्यातही कोरोना लसीकरण सुरु आहे. याचवेळी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

जालना : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नसून, गेल्या कोरोनाच्या कचाट्यात कोरोनाशी दोन हात आठवडाभरापासून दररोज सरासरी २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी जिल्ह्यात २०४ जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले असून, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. (two health officials corona Positive after second dose of corona Vaccine in Jalana, Maharashtra)

राज्यासह जिल्ह्यातही कोरोना लसीकरण सुरु आहे. याचवेळी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात दोन हात करणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले तसेच जिल्हा परिषदेचे डीएचओ. विवेक खतगावकर तसेच समन्वयक डॉ. संतोष कड़ले हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनी देखील कोरोनाच्या प्रचलित लसीचे दोन डोस पूर्ण केले होते. त्यानंतरही कोरोनाने यांना गाठल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

असे असले तरी लसीकरण हे चुकीचे आहे, असे न समजण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लस घेतल्यावरही मास्क आणि सॅनिटायझरचा नियिमित उपयोग बंधनकारक करण्याची गरजही व्यक् केली जात आहे. सुरक्षित अंतरालाही तेवढेच महत्त्व असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाचा शहर आणि तालुकानिहाय तपशील खालीप्रमाणे आहे. त्यात जालना शहर १३९, तालुका टाकरवन १, भाटेपुरी १, सेवली १, गोलापांगरी २, पहेगाव १, कुंभेफळ २, मंठा शहर १, मंठा तालुका पांगरी गोसावी १,परतूर शहर २, तालुका वादूर फाटा २, वाघडी १, दैठणा २, पोखरी १ तसेच घनसावंगी शहर तालुक्यातील रांजणी १, वडीरानगर १, रांजणवाडी १, देवनगर १, अंबड शहर ३, तालुका घुंगई हादगाव १, जामखेड ३, हस्तपुरी १, मठपिंपळगाव एक, माहेर भायगव्हाण १, बदनापूर तालुका आन्वी १, वाकुळणी दोन, असरखेडा १, बदनापूर १, शेलगाव २, जाफराबाद शहर 3, गारखेडा १, हनुमंतखेड २, जानेफळ १, जवखेड १, वरूड १, भोकरदन शहर २, तालुक्यातील वालसांगी २, केदारखेडा दोन, दानापूर २ असे एकूण २०४ रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या