- सुनील पाटीलजळगाव : जळगाव जिल्हा हा गावठी पिस्तूल तस्करीचे मुख्य केंद्र बनला असून येथून महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यात पिस्तुलाची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे. महामार्गाचे जाळे, मध्य रेल्वेचे माहेरघर असलेले भुसावळ, वाढती गुन्हेगारी व पिस्तूल निर्मितीचे उमर्टी हे ठिकाण जिल्ह्याला लागूनच असल्याने तस्करीचे जाळे विस्तारले आहे. पाच वर्षांत पोलिसांनी १७६ गावठी पिस्तूल व २२० काडतुसे जप्त केली असून २३२ आरोपींना अटक केली आहे. चोपडा तालुक्याच्या पायथ्याशी डोंगराळ वस्तीत उमर्टी नावाची दोन गावे वसलेली असून एक गाव जळगाव जिल्ह्यात तर दुसरे गाव मध्य प्रदेशात येते, दोन्ही गावांमध्ये जाण्यासाठी मध्ये फक्त एक नदी आहे. मध्य प्रदेशात येणाऱ्या उमर्टीत ठिकठिकाणी पिस्तुलांची निर्मिती केली जाते. पिस्तूल तयार करणाऱ्यांचे जिल्ह्यात दलाल व गुन्हेगारांशी थेट संपर्क असल्याने त्यांच्या माध्यमातून पुणे, मुंबईसह राज्यात व शेजारच्या गुजरातमध्ये पिस्तूल रवाना केले जातात. उमर्टी हे गाव मध्य प्रदेशात येत असले तरी त्याचा दैनंदिन व्यवहार हा जळगाव जिल्ह्यातच होतो. यावल-चोपडा या मार्गाने कार, दुचाकीने तर भुसावळ येथून रेल्वेने देशभरात पिस्तुलाची तस्करी होते. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातूनही गावठी पिस्तुलाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. जप्त केलेले आरोपींकडेच आढळून आले आहेत.वर्षनिहाय पकडलेले पिस्तूलवर्ष आरोपी पिस्तूल काडतूस २०१६ २५ १६ २५ २०१७ ३२ ३० ३६ २०१८ १९ १७ २१ २०१९ ७१ ५४ ५७ २०२० ८५ ५९ ८१ एकूण २३२ १७६ २२०दहा हजारांपासून पिस्तूल उपलब्धदहा हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत पिस्तूल मिळतात. उमर्टी गावात तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचेही प्रसंग आहेत.
गावठी पिस्तूल हवेत, तर या जळगावला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 3:14 AM