प्रत्येकी तीन लाखात फसविले : वडली, विटनेर, बोरनारमधील अनेकांना गंडा
जळगाव, दि.24 - मलेशिया येथे र्मचट नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन मुलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े जळगाव तालुक्यातील बोरनार, वडली, विटनेर यासह अनेक तरूणांची फसवणूक झाली आह़े
2006 मध्ये अमळनेर (जि.जळगाव) येथील यशोदीप संजय पाटील या युवकाने बोरनार येथील युवकांशी संपर्क साधत मलेशियामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. यासाठी यशोदीपने प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले. पण ठरल्याप्रमाणे र्मचट नेव्हीत नोकरी न मिळाल्याने अखेर संबधित तरूणांनी गुरूवारी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. यशोदीपने सुरुवातीला बोरनार येथील सचिन कोळी, किशोर बडगुजर यांना फसविल़े या दोघांनी विक्की देवरे , सोरग भोई दोघे रा.बोरनार, जगदीश चौधरी,रा.बेटावद, ता.जामनेर या तिघांना फसविल्याची माहिती समोर येत आहे.