शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
2
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
3
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
4
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
5
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
6
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
7
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
8
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
9
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
10
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
11
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
12
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
13
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
14
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
15
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
16
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
17
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
18
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
19
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
20
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'

मृत्यूचा ट्रॅक, ट्रॅकवर भयंकर दृश्य: मृतदेहांचा खच, जखमींचे विव्हळणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 06:35 IST

Jalgaon Railway Accident: परधाडे रेल्वेस्टेशनजवळ झालेल्या रेल्वे अपघातानंतर कुणाचे हात, कुणाचे पाय, तर कुणाचे अर्धे धड रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले होते. जखमी प्रवाशांना होत असलेल्या वेदनांमुळे ते किंचाळत होते.

- भूषण श्रीखंडेजळगाव - परधाडे रेल्वेस्टेशनजवळ झालेल्या रेल्वे अपघातानंतर कुणाचे हात, कुणाचे पाय, तर कुणाचे अर्धे धड रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले होते. जखमी प्रवाशांना होत असलेल्या वेदनांमुळे ते किंचाळत होते. हा किंचाळण्याचा आवाज अजूनही कानात व मनात गुंजत असल्याचा अनुभव कर्नाटक (बंगळुरू) एक्स्प्रेसमधील प्रवासी नागनाथ घोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.

जळगाव जिल्ह्यातील पाचोराजवळील परधाडे येथील रेल्वे ट्रॅकवर बुधवारी सायंकाळी चार वाजता ही अपघाताची घटना घडली. या घटनेची आपबिती सांगताना घोडके म्हणाले की, चार वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानक सोडल्यावर काही अंतरावर गाडी आली असता बाजूच्या ट्रॅकवर उभी असलेली दिसली. या थांबलेल्या गाडीतील प्रवासी वेगात असलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली आल्याने प्रवाशांचा एकच आक्रोश सुरू झाला. सर्वत्र रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज झाल्याने काही अंतरावर गाडी लगेच थांबली. गाडीतील सर्व प्रवाशांसह मीदेखील खाली उतरलो. गाडीखालील व ट्रकच्या बाजुला मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. हे भयंकर दृश्य पाहून मी जागेवरच बसलो.

पुष्पक एक्स्प्रेस ही एका पुलावरील वळणाच्या ट्रॅकवर थांबलेली होती. या घटनेदरम्यान प्रवाशांच्या समोर कर्नाटक एक्स्प्रेस आल्याने अनेकांनी जीव वाचविण्यासाठी पुलाखाली उड्या मारल्या. त्यात ते प्रवासी गंभीर जखमी झाल्यामुळे ते विव्हळत असल्याचे भयंकर दृश्य दिसून आले.

ताशी ११० किमी वेगाने आली कर्नाटक एक्स्प्रेस आणि...पुष्पक एक्स्प्रेसच्या इंजिनच्या मागील डब्यातील प्रवाशांना धूर निघत असल्याचे दिसले. त्यातील काहींनी इंजिनच्या दिशेने डोकावून पाहिले. तेव्हा इंजिनमधून धूर निघत असल्याचा अंदाज काही प्रवाशांनी बांधला. या दरम्यान डी-३ या बोगीतील प्रवाशांनी चैन ओढली. त्यानंतर पुष्पक एक्स्प्रेस परधाडे स्टेशननजीक असलेल्या पुलानजीक थांबली. यादरम्यान जनरल बोगीतील काही प्रवासी खाली उतरले. ते समोरच्या रेल्वेरुळांवर जाऊन उभे राहिले. तशातच समोरून ताशी ११० किलोमीटर वेगाने कर्नाटक एक्स्प्रेस आली आणि रुळावर उभ्या प्रवाशांना चिरडत गेली. या एक्स्प्रेसच्या चालकानेही रेल्वेचा वेग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना मृत्यूची धडक बसून चुकली होती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातJalgaonजळगाव