- सुनील पाटील जळगाव : कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली आलेल्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह पाहून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात सारेच सुन्न झाले. मृतांमध्ये सारेच परप्रांतीय तसेच नातेवाईक जवळ नसल्याने आक्रोश करायलाही कोणीच नव्हते.
लखनऊ येथून विश्वकर्मा कुटूंबातील दोन जणांचा मृत्यू झाले होते. त्यांच्या कुटूंबातील एक महिला, दोन लहान मुलांना त्याची माहिती नव्हती. शवविच्छेदनगृहात जाण्याचीही त्यांची हिंमत होत नव्हती. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात रात्री आठ वाजेपर्यंत आठ जणांचे मृतदेह आले होते. शवविच्छेदनगृहातील मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला होता.
आठ वाजेपर्यंत कमला नयन भंडारी (वय ४७, रा.नेपाळ), हिनू नंदराम विश्वकर्मा, तच्छी राम वासी या तीन मृतदेहांची ओळख पटली होती. या तिघांचे कुटूंब रुग्णालयात होते. पोलीस प्रशासनाकडून त्यांना धीर दिला जात होता.