शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पश्चिम रेल्वेवर आज जम्बोब्लॉक

By admin | Published: July 02, 2017 4:17 AM

पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य, हार्बरसह

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेमार्गावरही मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर, हार्बर रेल्वेच्या नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम मार्गावर सांताकु्रझ ते माहीम स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असणार आहे. या कालावधीत सांताक्रुझ ते माहीम स्थानकांतील वाहतूक धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येतील. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत. माटुंगा ते मुलुंड स्थानकातील धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल. मुलुंड स्थानकाहून पुढे या लोकल पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.पनवेल-अंधेरी लोकलसेवा बंद नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ४ वाजेपर्यंत अप, डाऊन या मार्गांवर मेगाब्लॉक असेल. या कालावधीत नेरूळ ते पनवेलदरम्यानची वाहतूक सकाळी ११.०१ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत बंद राहील. पनवेल ते अंधेरी मार्गावरील लोकल सेवा बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटीएम ते नेरूळ, ठाणे ते नेरूळ या मार्गावर लोकलच्या विशेष सेवा चालवण्यात येतील. गोंधळ सुरूचहार्बर रेल्वेवर शनिवारी सकाळी कुर्ला आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. संबंधित कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत बिघाड दूर केला. मात्र सकाळी झालेल्या बिघाडाचा फटका अन्य लोकल सेवेला बसला. तत्पूर्वी, मंगला एक्स्प्रेसमुळे मध्य मार्गावरील लोकल सेवांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते.