ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवत दोन जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या जान्हवी गडकरला अखेर जामीन मिळाला आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने जान्हवी गडकरला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
आठ जून रोजी ईस्टर्न फ्रि वेवर मद्यधूंद अवस्थेत आलिशान ऑडी चालवणा-या जान्हवी गडकरने एका टॅक्सीला धडक दिली होती. या अपघातात टॅक्सी चालक व अन्य एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या जान्हवीला स्थानिकांनी पोलिसांच्या हवाली केले होते. जान्हवी गडकर ही एका ख्यातनाम कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत होती. याप्रकरणी जान्हवीला सुमारे दोन महिने तुरुंगाची हवा खावी लागली आहे.