भुसावळ (जि. जळगाव) : जळगाव जिल्ह्यासाठी जामनेर येथे इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे, तसेच केळी या भागातील महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे केळीपिकासाठी महामंडळाकडून तसे नियोजन सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.मुक्ताईनगर तालुक्यातील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, ‘भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी १०० कोटी रुपये देण्यात येतील, पुढील महिन्यात त्याचे भूमिपूजन केले जाईल.’‘कापूस उत्पादक दहा जिल्ह्यांमध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू होतील. अमरावतीत ते सुरू झाले आहे. त्याद्वारे साडेसात हजार लोकांना रोजगार मिळणार आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार, बांधकाम व पणनमंत्री चंद्रकांत पाटील होते.विमान थांबवून आमंत्रण स्वीकारलेजळगाव : मुक्ताईनगर येथील कार्यक्रम आटोपून माघारी निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी विमान थांबवून शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी (सातारा) यांच्याकडून गडकोट मोहिमेच्या समारोपाची निमंत्रण पत्रिका स्वीकारली.
‘जामनेरात टेक्स्टाईल पार्क उभारणार’
By admin | Published: January 01, 2016 12:16 AM