भुसावळ (जि. जळगाव) : जळगाव जिल्ह्यासाठी जामनेर येथे इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे. तसेच केळी या भागातील महत्त्वाचे पीक असल्याने केळीसाठी महामंडळ निश्चितपणे तयार केले जाईल, तसे नियोजन सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.मुक्ताईनगर तालुक्यातील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी १०० कोटी रुपये देण्यात येतील, पुढील महिन्यात त्याचे भूमिपूजन केले जाईल. कापूस उत्पादक १० जिल्ह्यांमध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू होतील. अमवरातीत ते सुरू झाले आहे. त्याद्वारे साडेसात हजार लोकांना रोजगार मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार, बांधकाम व पणनमंत्री चंद्रकांत पाटील होते.काँग्रेसतर्फे मुख्यमंत्र्यांना घेरावकर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, गुजरात पॅटर्नप्रमाणे कापसाला बोनस आदी मागण्यांसाठी तालुका काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिर प्रांगणात घेराव घालून निवेदन देण्यात आले.
जामनेरात टेक्स्टाईल पार्क उभारणार
By admin | Published: January 02, 2016 8:35 AM